Friday, April 26, 2024
Homeजळगावदीपोत्सव : नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी

दीपोत्सव : नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

अवघ्या काही दिवसावर येवून ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त सोमवारी बाजारपेेठेत महिलांसह नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.

- Advertisement -

अनेक नवनवीन साहित्य, कपडे, इलेक्ट्रीक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड अनेक ठिकाणी दिसून येत होती. दिपावलीमुळे बाजारात चैतन्याचे वातावरण आहे.

दिवाळीचा सण हा हर्षोल्हासाचा सण आहे. दिवाळी म्हटली की चिमुकल्यांचा आनंद व्दिगुणीत होतो. बाजारात इतरही अनेक नवनवीन वस्तू, उत्पादने, रांगोळी, करदोळा, बत्तासे, लक्ष्मीची पावले, लक्ष्मी, केरसूणी, डालकी, कुंभार बांधवांकडील दिवे, पणत्या व इतर वस्तू दाखल झाले आहेत.

शहरातील बळीराम पेठ परिसर, सुभाष चौक, राजकमल चौक परिसर, टॉवर चौक, कोर्ट चौक, जुने जळगाव, शनिपेठ, फुले मार्केट परिसर, जुना कापड बाजार, चित्रा चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने दिवाळी निमित्त थाटण्यात आलेली आहेत.

आकर्षक असे कंदिल यांना बाजारात अधिक मागणी आहे. यावेळी किमान 10 टक्के भाववाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांची मोठी रेलचेल बाजारपेठेत वाढू लागली आहे.

केरसुणी, डालकी

खरी लक्ष्मी ही केरसूणी असते. केरसूणीची पूजा घरोघरी धनतेरस व लक्ष्मीपूजनला केली जाते. केरसूणी ही घराची लक्ष्मी आहे. त्यामुळे केरसूणीला दिवाळीच्या सणात अनन्य साधारण महत्व असते. केरसूणीचा जोड 70 ते 100 रुपयापयर्र्त आहे तर डालकी 50 रुपये नग प्रमाणे, तसेच घरातील मंदिर साफसफाईसाठी छोट्या केरसूणीची गरज असते. ही केरसूणीही बाजारात उपलब्ध आहे. छोटी केरसूणी 15 रुपये प्रमाणे.

मांगल्याचे प्रतीक महालक्ष्मीच्या खरेदीसाठी झालेली महिला वर्गाची गर्दी

केरसूणीची पूजा घरोघरी धनतेरस व लक्ष्मीपूजनला केली जाते. त्याप्रमाणे महालक्ष्मींची पूजा ही घरोघरी केली जाते. महालक्ष्मी ह्या हातगाड्यांवर ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. बळीराम पेठ, शनिपेठ, सुभाष चौक, टॉवर चौक ते एम जी रोड, घाणेकर चौकापर्यंत अशा विविध ठिकाणी महालक्ष्मी विक्रीस उपलब्ध आहे. लहान महालक्ष्मी 40 ते 50 तर मोठी 300 ते 351 रुपयापयर्र्त तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे 100 पासून 200 रुपये पयर्र्त विक्रीस उपलब्ध असल्याचे एक विक्रेता बबलु कुंभार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बत्तासे छोटे माप 10 रुपये, मोठे माप 20 रुपये तसेच छोटी पुडी 10 रुपये याप्रमाणे बत्तासे, साळी लाह्या हा प्रसाद उपलब्ध आहे.

लक्ष्मीची पावले

लक्ष्मीची पावले ही 10 रुपये नग प्रमाणे छोट्या प्रकारात तर लक्ष्मीची मोठी पावले असलेले जोड 20 रुपये जोड याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहे. लक्ष्मी व इतर देवतांचे फोटो ही विक्रीस उपलब्ध आहेत. 10 ते 20 रुपयेप्रमाणे हे फोटो मिळत आहेत. तसेच सोने चांदी, दुचाकी वाहने, इलेक्र्ट्रॉनिक्स वस्तू, रेडिमेड कपडे, मोबाईल आदी वस्तूंनाा बाजारपेठेत चांगला प्रतिसाद दिसून आला असून दिवाळीपयर्र्त यात आणखी वाढ होत राहणार असल्याचे व्यापारी दुकानदारांकडून बोलले जात आहे. नागरिकांच्या हातात पैसा खेळू लागल्याने अनेक वस्तूंची बाजारपेठ गरम होत असून दोन दिवसापासून चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चहलपहल दिसून येत आहे. सुदैवाने ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाची मरगळ झटकून नागरिक आता बाजारपेठेकडे वळू लागले आहेत, नव्या उमेदीने व्यावसायिक, दुकानदार व्यवसायात लागले आहेत.

रांगोळ्या खरेदीस गर्दी

विविध प्रकारच्या रांगोळ्या खरेदीस महिलांची विशेष गर्दी होत आहे. रांगोळी प्रकारात विविध प्रकारच्या रंगाच्या रांगोळ्या आहेत. त्यात कलर रांगोळी ही 30 ते 40 रुपये किलो तर पांढरी रांगोळी 10 रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे. तसेच रांगोळी लहान पाकीट 5 रुपये तर मोठे पाकीट 10 व 20 रुपये नगप्रमाणे विक्री केली जात आहे. तसेच घराला रंग देण्यासाठी गेरु हा 30 रुपये किलो प्रमाणे विक्रीस उपलब्ध असल्याचे विजय कासार या व्यावसायिकानी स्पष्ट केले. साधारण पत्रे व मातीची घरे असलेले नागरिक गेरुची खरेदी करतात.

आठवडाभर बाजारात अशीच स्थिती कायम

दिपावली सणानिमित्त आठवडाभर बाजारात अशीच स्थिती कायम राहणार आहे. किंबहुना यापेक्षा अधिक प्रमाणात गर्दी विविध खरेदीसाठी वाढणार आहे. 10 ऑक्टोेंबरच्या अगोदर कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होता. त्या धक्क्यातून आताशी कुठे नागरिक मरगळ झटकून नव्या उमेदीला लागले आहेत. दिव्या दिव्यांनी परिसर उजळतो त्यामुळे कोरोनाच्या सावटातून आता नागरिक बर्‍यापैकी सावरत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या