Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशआज एका तासासाठी उघडणार शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल

आज एका तासासाठी उघडणार शेअर बाजार, जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल

प्रकाशाचे पर्व (Festival of light) मानला जाणारा दिवाळीचा सण (Diwali festival) भारताच्या मुख्य सणांपैकी एक आहे.

हा सण देशभर साजरा केला जातो आणि हे हिंदू आर्थिक वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीकही मानले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय शेअर बाजाराने (Indian share market) खास व्यापारी सत्र आयोजित केले आहे.

- Advertisement -

स्टॉक ट्रेडर्स (stock traders) आणि गुंतवणूकदारांनी (investors) यावर्षीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी (Muhurta trading) कंबर कसली आहे.

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजार (Indian share market) लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Poojan) विशेष वेळी खास ट्रेडिंग सत्राचे आयोजन करतो ज्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.

यादिवशी व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी हमी खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी शुभवेळेदरम्यान हिंदू पंचांगानुसार खास ट्रेडिंग विंडो उघडली जाते.

यावर्षी स्टॉक एक्स्चेंजेसनी पारंपरिक एका तासाच्या विशेष मुहुर्तासाठी ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ६:१५ ते ७:१५ ही वेळ ठरवली आहे.

ब्लॉक डील सत्र सायंकाळी ५:४५ ते ६:०० वाजेपर्यंत चालणार आहे. प्री-ओपन सत्र सायंकाळी ६:०० वाजता सुरू होऊन ६:०८ वाजता संपणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या