Saturday, April 27, 2024
Homeधुळेकरवंदला दिव्यांगांनी केले रक्तदान

करवंदला दिव्यांगांनी केले रक्तदान

कुरखळी । वार्ताहर kurkhadi

करवंद (ता.शिरपूर) येथे शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरुणांनी चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया, या मोहिमंतर्गत रक्तदान शिबिर घेतले. यास तरुणांसह ग्रामस्थांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमत: दिव्यांगांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली. यावेळी 52 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरात महिलांचा देखील सहभाग लाभला.

- Advertisement -

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर करवंद येथे रक्तदान शिबीर पार पडले. सुरुवातीला प्रदीप पाटील आणि हरपालसिंग राऊळ या दिव्यांगांसह जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र पाटील यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.

या शिबिरासाठी जीवन ज्योती ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिबिरात हर्षली राऊळ व ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री धाकड या तरुणींनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रदीप राजपूत, नीलेश चव्हाण, राहुल पाटील, सुकदेव पाटील, जगदीश राजपूत, उसन्नोद्दीन जमादार, अशोक राजपूत, सागर चव्हाण, आसिफ खाटीक, किशोर मेटकर, सतीश कुवर, प्रवीण पाटील, जितेंद्र पाटील, विशाल शिंपी, अजय कोळी, भगवान पाटील, मनोहर पाटील, महेंद्र पाटील, रफीक खाटीक, संदीप कुवर, मनोज पाटील, गोपाल राऊळ, शकीलशेख गणी, शांतीलाल पाटील, योगेंद्र आनंदसिंग राऊळ, दिनेश पाटील, भास्कर कुवर, योगेश बोरसे, गोपालसिंग काशिनाथसिंह राऊळ, डॉ. सागर देसरे, प्रेम वाणी, तुषार साळुंके, सतपालसिंग राऊळ, किर्तीसिंग राऊळ, प्रदीप सोनवणे, उमेश सांजोरे, नीलेश पाटील, विनोद कोळी, किशोर कुवर, हेमंत शिंपी, जितेंद्र राजपूत, संदीप देवरे, प्रवीण देवरे, राजकुमार वाघ, आकाश वाघ, रोहीत थोरात, भटू अधिकार पाटील, गोपालसिंग चंद्रसिंग राजपूत (राऊळ), वसीमशेख जमादार यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी ग्रामसेवक आनंदा पाटील आणि योगेंद्रसिंग राऊळ यांनी दूध आणि फळांचे वाटप केले.

माधवसिंग राऊळ यांनी पिण्याच्या पाण्याची तर संदीप राऊळ यांनी खुर्च्यांसह बैठक व्यवस्था केली. शिबिरासाठी सुरेश सोनार, गणेश बोरसे, जयेंद्रसिंग राऊळ, माजी उपसरपंच अशोक पाटील, फकरुद्दीन जमादार, रणछोड शिंपी, सुनील भाईदास पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी आनंदसिंग राऊळ, प्रेमसिंग राऊळ, अशोक भाईदास पाटील, अण्णा वाणी, चेतन माहेश्वरी, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पाटील, राकेश पाटील उपस्थित होते. शिबिराचे संयोजन गोपालसिंग राजपूत (राऊळ) व मित्र परिवाराने केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या