Wednesday, April 24, 2024
Homeनगरझेडपीच्या सीईओ पदाचा प्रभारी पदभार विभागीय उपायुक्त शिंदेंकडे

झेडपीच्या सीईओ पदाचा प्रभारी पदभार विभागीय उपायुक्त शिंदेंकडे

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्हा परिषदेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नाशिक विभागीय कार्यालयातील उपायुक्त डी.डी शिंदे (आस्थापना) यांची नियुक्ती

- Advertisement -

करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतचे आदेश काढले असून ते काल शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

नगर- आळाफाटा रोडवर 19 जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वाहनाला अपघात झाल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रशासकीय कामाच्यादृष्टीने कारभार सोपविणे आवश्यक असल्याने क्षीरसागर हजर होईपर्यंत या पदाची जबाबदारी उपायुक्त शिंदे आस्थापना विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी अथवा अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी यांच्या खांद्यावर धूरा सोपविण्यात आलेली आहे.

यात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची बदली झाल्यानंतर त्याठिकाणी नवीन अधिकारी हजर होईपर्यंत, सीईओ दीर्घ काळ रजेवर असल्यास अथवा निवडणूक कामी गेल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त असेल त्यात्यावेळी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी अथवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रभारी पदाभार स्वीकारलेला आहे. मात्र, यावेळी विभागीय आयुक्त गमे यांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त शिंदे यांच्याकडे नगर जिल्हा परिषदेचा पदभार सोपविल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या