Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविभागीय आयुक्तालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकांना सुरुवात

विभागीय आयुक्तालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकांना सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक नियोजन भवन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे पार पडली…

- Advertisement -

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बोरसे,

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या