Thursday, April 25, 2024
Homeधुळेसाक्री तालुक्यात विभाजन करून 14 नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात

साक्री तालुक्यात विभाजन करून 14 नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

साक्री तालुक्यातील (Sakri taluka) पिंपळनेर आदिवासी पट्ट्यातील ग्रामपंचायतींचे (gram panchayats) विभाजन (Dividing) करून नवीन 14 ग्रामपंचायती ( new gram panchayats) अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे गाव पाड्याच्या विकासाला (development) गती मिळणार आहे .

- Advertisement -

साक्री तालुक्यात पश्चिम पट्टयातील 25 ते 30 वर्षापासून अनेक वाडे, पाड्यांचा विस्तार झाला आहे. त्यामुळे नवीन ग्रामपंचायत विभाजनासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी (villagers

Demand) केली होती. म्हणून 7 ग्रुप ग्रामपंचायतमधून 14 ग्रामपंचायत नवीन निर्माण करण्यात आल्या. साक्री तालुक्यातील आदिवासी उपयोजना कार्यक्षेत्रातील पश्चिम पट्टयातील मूळ ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा मधून (मल्ल्याचा पाडा) वाकी ग्रामपंचायतमधून बोढरी पाडा व चिंचपाडा) तसेच देगाव ग्रामपंचायत मधून (गवाणीपाडा) सुकापुर मधून (होळ्याचा पाडा, हारपाडा, व महाळ्याचा पाडा) नवीन ग्रामपंचायत (gram panchayats) अस्तित्वात आल्या आहेत.

कुडाशी मूळ ग्रामपंचायतमधून (पोहबारा, महुबंद) नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली आहे. टेंभे प्र वार्सा मधून नवीन पुनाजी नगर, जयराम नगर,व शिवाजीनगर) या नवीन ग्रामपंचायत निर्माण झाल्यात. काकरदे मूळ ग्रामपंचायतमधून (राईनपाडा, हनुमंत पाडा, या नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.

एकूण सात मूळ ग्रामपंचायतमधून नवीन 14 ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे राजपत्रात तसे नमूद करून जाहीर केले आहे.

या ग्रामपंचायत विभाजनासाठी (Dividing) काकरदे ग्रामपंचायतीचे रहिवासी व जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल, टेंभा ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत राऊत व कमलाकर साबळे, सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच पंडित चौरे व माजी सभापती गणपत चौर, पंचायत समिती सदस्य राजू पवार, देगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच काळू बहिरम यांनी विशेष परिश्रम घेतले.

वाकीचे सरपंच जालमसिंग देसाई, कुडाशीचे माजी सरपंच गोकुळ गवळी, पानखेडाचे सरपंच छगन चौरे, प्रवीण चौरे, निंबा भोये यांनी नवीन ग्रामपंचायत विभाजनासाठी पाठपुरावा केला. संबंधित ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी सहकार्य केले.

या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी माजी खा.बापू चौरे, आ.सौ.मंजुळा गावित, जि. प सदस्य विश्वास बागुल, तसेच बागुल भाऊसाहेब व मंत्रालय स्तरावर सुकापुर येथील रहिवासी गुलाब चौधरी यांनीही पाठपुरावा करून सहकार्य केले. ग्रामपंचायत विभाजन होऊन 14 नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येण्यासाठी सर्वांची मोठी मदत झाली. या विभाजनामुळे येथील स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे पेसाअंतर्गत निधी (Funding under PESA) आता प्रत्येक गाव पाड्याला मिळणार म्हणून या गावांच्या विकासाला अधिक गती मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या