Thursday, April 25, 2024
Homeजळगावग. स. सोसायटीच्या जिल्ह्यातील 35 हजार सभासदांना लाभांश वाटप सुरू

ग. स. सोसायटीच्या जिल्ह्यातील 35 हजार सभासदांना लाभांश वाटप सुरू

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात जिल्ह्याभरातील ग.स.सोसायटीच्या विविध 55 शाखांमध्ये बुधवारी 10 टक्के लाभांश वाटपाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

ग.स.सोसायटीने विशेष कर्जात 2 लाख 50 हजाराची वाढ केली आहे. जनता अपघात विमा 1 लाखावरून 3 लाख करण्यात येणार आहे. संस्थेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील 35 हजार सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप जिल्ह्याभरातील विविध शाखांमध्ये सुरळीत सुरु आहे.

- Advertisement -

मनोज पाटील, ग.स.अध्यक्ष

तसेच शहरातील गोलाणी मार्केटमधील ग.स.सोसायटीच्या विविध शाखांवर रांंगेत लाभांश घेण्यासाठी शिक्षकांसह सभासदांची गर्दी झाली होती.

सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सभासदांची गर्दी पाहून गोलाणी मार्केटला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दुपारी 2.20 वाजेनंतर तुरळक गर्दी होती.

आशिया खंडात नावाजलेली जळगाव येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी) चे खेळते भांडवल 1 हजार 67 कोटी रुपये आहे.

तसेच यावर्षी महापालिकेतील 5 कोटी रुपयांची वसुली झाल्याने या आर्थिक वर्षात 15 कोटी 11 लाख 58 हजार 729 रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे.

यंदा सभासदांसाठी 10 टक्के लाभांश देण्याची घोषणा ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरपगार यांच्यासह संचालकांनी केली होती. त्यानुसार त्याची अंमलबजावणी दि. 11 नोव्हेंबरपासून करण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, जळगाव, भुसावळ, पारोळा, अमळनेर,चाळीसगाव, यासह जिल्ह्याभरातील विविध 55 शाखांमध्ये सभासदांना लाभांश वाटप करण्यात येत आहे.

ज्या सभासदांकडे थकबाकी आहे, अशा सभासदांना वगळता 31 मार्चपर्यंत सभासदत्व पूर्ण असलेल्या सभासदांना 10 टक्के लाभांश मिळणार असून जिल्ह्यातील 35 हजार सभासदांना त्याचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिली.

ग.स.सोसाटीच्या शाखांवर रांगा

शहरातील गोलाणी मार्केटमधील ग.स.सोसाटीच्या शाखांवर सभासदांनी रांगा लावून 10 टक्के लाभांश रक्कमेच्या धनादेश घेवून आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी धावपळ सुरु होती.

त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गोलाणी मार्केटच्या विविध शाखांमध्ये सभासदांची गर्दी झाली होती. यात महापालिका, बांधकाम विभागातील कर्मचारी वगळता शिक्षक सभासदांची मोठ्या प्रमाणात संख्या होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या