योग्य नियोजनामुळेच लाभांश वाटप : होळकर

jalgaon-digital
2 Min Read

महादेवनगर। वार्ताहर Niphad

नोटबंदी (Denomination), करोना (corona) या संकटामुळे सहकार क्षेत्रातील (Cooperative sector) विकास सोसायट्यांचे पूर्णत: खच्चीकरण झालेले असून स्वनिधी आणि ताळेबंदाचे गणित अवघड बनले आहे. रिझर्व बँकेचे (Reserve Bank) निर्देशांचे व निर्बंधांचे पालन करणे त्यातच नोटबंदी पासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Nashik District Central Co-operative Bank) विकास संस्थेच्या ठेवी अडकल्यामुळे विकास संस्था चालवणे अवघड झाले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर देवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप केले ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असून संस्थेचे कामकाज व नियोजन (planning) चांगले असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Mumbai Agricultural Produce Market Committee) संचालक जयदत्त होळकर यांनी केले आहे. देवगाव येथे विकास संस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप प्रसंगी होळकर बोलत होते.

यावेळी नामदार भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, येवला बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, राष्ट्रवादीचे शिवाजी सुपनर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, पं.स. सदस्य शिवा सुराशे, माजी पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, डॉ.विकास चांदर, कानळद सरपंच शांताराम जाधव, मधूकर गायकर, संजय घायाळ उपस्थित होते.

यावेळी माजी सरपंच विनोद जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, थकबाकीदार सभासदांना संस्था पातळीवर 6 टक्के व्याजात सवलत देण्यात आली असून 15 टक्के लाभांश वाटप करणारी परिसरातील एकमेव संस्था आहे. संस्थेच्या गोडाऊन च्या जागेवर गाळे व पहिल्या मजल्यावर फ्लॅट सिस्टीम कामास नुकतीच मंजुरी मिळाली असून लवकरच बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रामकृष्ण बोचरे, व्हा. चेअरमन घेगडमल, जयंत लोहारकर, सतीश लोहारकर, रत्नाकर शिरसाठ, रामनाथ बोचरे, प्रभात बोचरे, सचिन बोचरे, माधव निलख, राजेंद्र मेमाणे, नाना लोहारकर, बाळासाहेब लोहारकर, राजेंद्र जोशी, अण्णा उफाडे, परशराम खुळे, रघुनाथ सोमवंशी, संतू गायकवाड, रेवनसिद्ध लोहारकर, सचिन गायकवाड, सोमनाथ निलख, इसाक शेख, आबुभाई काद्री, सोसायटी सचिव रावसाहेब पगारे, रामदास बोचरे, सुनील माने आदींसह सोसायटी सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *