Saturday, April 27, 2024
Homeनाशिकरेशन धान्य वितरणाला ई-मशीनचा पॉझ

रेशन धान्य वितरणाला ई-मशीनचा पॉझ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

धान्य वितरण प्रणाली (Grain distribution system )सुरळीत आणि जलदगतीने व्हावी, यासाठी ई-पॉझ यंत्रणा (E-pause system )राबविण्यात येत असली तरी या यंत्रणेतील दोषामुळेच (Due to a fault in the system )धान्य वितरणाला अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

सर्व्हर डाऊन (Server down )होत असल्यामुळे धान्य असूनही वाटप करता येत नसल्याची परिस्थिती ओढवते. याच कारणास्तव फेब्रुवारीच्या धान्य वितरणाला 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रेशन कार्डधारकांचा थम घेऊन धान्य वितरण केले जाते ते ई-पॉझ मशीन सातत्याने बंद राहत असल्याने धान्य वितरणात खोडा निर्माण होतो.

दरम्यान, ही यंत्रणा सर्व्हरशी कनेक्ट असल्यामुळे सर्व्हर डाऊन झाले की धान्य वितरणप्रणाली कोलमडून पडते. असा प्रसंग दर महिन्याला कमी-अधिक प्रमाणात उद्भवतो आणि रेशन दुकानदारांना धान्यवाटप करण्यासाठी मुदतवाढ दिली जाते. यंदाही अशा प्रकारची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नियमितचे धान्य 15 मार्च पर्यंत 87 टक्के वाटप झालेले आहे तर आता फेब्रुवारीचे मोफतचे धान्य वितरणासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

रेशन दुकानदारांच्या ( Ration Shops )माध्यमातून कार्डधारकांना निर्धारित वेळेत धान्य वितरित करणे आवश्यक आहे. दुकानदारांना नियमित कार्डधारकांना देण्यात येणारे धान्य आणि मोफतचे धान्य वाटप केले जाते. परंतु सर्व्हरचा अडसर निर्माण होतो आणि वितरण प्रणालीला दिरंगाई होते. सर्व्हर डाऊनमुळे रेशनच्या धान्याचा कोटा पडून होता. धान्य असताना ते वाटपही करता येत नव्हते.

त्यामुळे रेशन दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग निर्माण होत होते. यामुळे तर दुकानदारांनी पाँझ मशीन बदलून देण्याची मागणीच दुकानदारांनी केली होती. नियमित धान्य आणि मोफतचे धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने कार्डधारकांना विभागाने आता मुदतवाढ दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या