Tuesday, April 23, 2024
Homeजळगावराज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडचाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

राज्य डॉजबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवडचाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

जळगाव – jalgaon

सांगली (sangli) येथे होणाऱ्या राज्य ज्युनियर डॉजबॉल स्पर्धेसाठी (State Junior Dodgeball Tournament) जळगाव जिल्हा संघनिवडचाचणी व अजिंक्यपद स्पर्धा आज बी.यु.एन.रायसोनी विद्यालयाचे क्रीडांगणावर संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाटन बी.यु.एन.रायसोनी विद्यालयाचे चेअरमन शिरिष रायसोनी यांनी श्रीफळ वाढवून व स्वतः खेळून केले.

- Advertisement -

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे (Jalgaon District Dodgeball Association) अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष प्रा ईकबाल मिर्झा व गिरीश पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, संचालक प्रा.हरिश शेळके, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांची उपस्थिती होती.

संघ निवड समिती सदस्य म्हणून सहसचिव विजय विसपुते, संचालक नितीन पाटील व सचिन महाजन यांनी तर पंच म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू उमाकांत जाधव, राष्ट्रीय खेळाडू प्रकाश सपकाळे व चेतन जोशी, सौरभ कदम यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव विजय विसपुते यांनी केले स्पर्धेत मुलांचे ११ तर मुलींचे ९ संघ सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या