Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘गुरूजीं’ची जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड अंतिम टप्प्यात

‘गुरूजीं’ची जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड अंतिम टप्प्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवर्षी पाच सप्टेंबरला देण्यात येणार्‍या तालुकानिहाय 14 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची निवड आता अंतिम टप्प्यात आहे. या पुरस्कारासाठी मागील आठवड्यात लेखी परीक्षा पूर्ण झाली असून शिक्षकांची तालुकानिहाय माहिती आणि क्रॉस तपासणी पूर्ण होवून, लेखी परीक्षेचे गुण यांची गोपनीय माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. लवकरच येरेकर या माहितीची पडताळणी करून त्याआधारे गुणवत्तेनूसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा 14 प्राथमिक शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आणि एका केंद्र प्रमुखाची निवड करणार आहेत.

- Advertisement -

दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात चांगले काम करणार्‍या प्राथमिक शिक्षाकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 14 शिक्षकांची निवड करण्यात येते. यासाठी संबंधीत शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची क्रॉस पडताळणी करण्यात येते. या पुरस्कारासाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, शैक्षणिक ब्लॉग, वेबसाईटची निर्मितीवर त्यावर केलेले लिखान, शैक्षणिक युटूब चॅनलची निर्मिती, वेगवेगळ्या पातळीवर प्रकाशीत केलेले विविध शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सहल, इस्त्रोसहल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढसाठी केलेले विविध प्रयोग, इंग्रजी माध्यमातून झेडपीच्या शाळेत विद्यार्थी येण्यासाठी केलेले प्रयोग यासह अन्य शैक्षणिक कामगिरी याचे मुल्यमान या पुरस्कारासाठी करण्यात येते.

यासाठी 100 गुण असून यासह 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यात मिळालेल्या गुणांची गोपनिय यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. या यादीत सर्वाधिक गुण मिळवणार्‍या प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे 14 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यासह एका केंद्र प्रमुखांची देखील या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.

काही तालुक्यातून दोन तर काही तालुक्यातून तिन अशा 38 शिक्षकांचे पुरस्कारासाठी प्रस्ताव शिक्षण विभागकडे प्राप्त झाले होते. या प्राप्त पुरस्कारांचे 100 गुणांची तालुकानिहाय अधिकार्‍यांच्या समितीकडून क्रॉस तडताळणी करण्यात आली आहे. त्यानूसार गुणाकंन करून त्यांची गोपनिय पाकीट करून ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. यासह मागील आठवड्यात शुक्रवारी 25 गुणांची परीक्षा झाली असून त्याचे गुण सीईओंकडे सादर करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या