प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत सहभागी व्हा !

jalgaon-digital
4 Min Read

जळगाव – jalgaon

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत (Pradhan Mantri Fasal Vima Yojana) पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता (Banana) केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे.

या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (Agriculture Officer Sambhaji Thakur) कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट, पपई फळपिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता गारपीट, आंबा फळ पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, तर डाळिंब या फळ पिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज ( उदा. मोसंबी व डाळिंब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

आंबिया बहार 2021-22 करीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम व योजनेत सहभाग घ्या…

सहभागी होण्याची अंतिम मुदत

केळी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000 गारपीट -46,667, विमा हप्ता रक्कम – 10500, 2333 अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, मोसंबी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 80,000 गारपीट -26,667/-, विमा हप्ता रक्कम – 4000, 1333 अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, पपई -विमा संरक्षित रक्कम-हेक्टर – 35,000 गारपीट -11,667, विमा हप्ता रक्कम – 1750/- 583 अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, आंबा -विमा संरक्षित रक्कम-हेक्टर – 1,40,000 गारपीट -46,667, विमा हप्ता रक्कम –23800, 2333 अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, डाळिंब- विमा संरक्षित रक्कम – हेक्टर – 1,30,000, गारपीट -43333, विमा हप्ता रक्कम –28600, 2167 अंतिम मुदत 14 जानेवारी, 2021 पर्यंत आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहाराकरीता अधिसूचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. फळ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषी अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई, क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई – 400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, ई – मेल [email protected]. जिल्हा प्रतिनिधी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473 यांच्याशी संपर्क साधावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *