Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात ग्राहक मध्यस्थ केंद्र सुरू करा

जिल्ह्यात ग्राहक मध्यस्थ केंद्र सुरू करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांची वैद्यकीय, व्यापार, सेवा, शैक्षणिक, सहकार, कंपनी,

- Advertisement -

अन्न-औषध क्षेत्रात होणारी लूट थांबवण्यासाठी ग्राहक सरंक्षणाच्या नवीन कायद्यातील कलम 74 नुसार जिल्ह्यात ग्राहक मध्यस्थ केंद्र स्थापन करावे, अशी मागणी बागवान, आतार, तांबोळी, रंगरेज, खाटिक, मणियार, काकर समाजांच्या प्रमुख प्रतिनिधींनी केली आहे. केली.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना ई- मेल द्वारा पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यरत आहे. नवीन ग्राहक कायद्यानुसार ग्राहक वाद निवारण आयोगही आहे. मात्र, त्यानंतरही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ग्राहकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

ग्राहकांची विविध क्षेत्रात सुरू असलेली लूट थांबवण्यासाठी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 तयार करण्यात आला आहे. त्यात 107 कलमांचा अंतर्भाव आहे. नवीन कायद्याच्या कलम 74 मधील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक मध्यस्थ केंद्र सुरू करावे. या केंद्रात विना विलंब, विना खर्च ग्राहकांना न्याय देण्यात यावा. अशीही मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा संघटक पत्रकार शफीक बागवान, अ‍ॅड. हारुण बागवान, अ‍ॅड.आरिफ शेख, डॉ. तोफीक शेख, अकबर बागवान, रफीक बागवान, जाकीर हुसेन बागवान, अबुभाई कुरेशी, इस्माईल बागवान, असिफ पिंजारी, हुमायून अन्सारी, कय्युम नालबंद, अहमद रंगरेज, शफीक आतार, जाफर आतार, साजिद मणियार, रशिद रंगरेज,इकबाल काकर,आसिफ बागवान, मोहसीन तांबोळी, मुशताक आतार,भिकन खाटिक, हमीद खाटिक, मुजीम चौधरी, अन्वर खाटिक, दिलावर खाटिक, आरिफ कुरेशी आदींनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या