Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये लवकरच जिल्हा क्रीडा संकुल

नाशिकमध्ये लवकरच जिल्हा क्रीडा संकुल

पंचवटी । वार्ताहर Nashik

केवळ एकाच खेळामध्ये न रमता युवकांनी सर्वच खेळांमध्ये तरबेज व्ह्यायला पाहिजे. नाशिकमधून जास्तीत जास्त खेळाडू तयार करण्यासाठी नाशिकमध्ये लवकरच जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले .

- Advertisement -

मखमलाबाद येथील व्हीके मल्टिस्पोर्ट्स क्लबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपमहापौर भिकुबाई बागुल , बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे , माजी आमदार बाळासाहेब सानप , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे ,माजी नगरसेवक दामोधर मानकर , डॉ. जगन्नाथ तांदळे , नगरसेविका सुनीता पिंगळे , नगरसेविका इंदूबाई नागरे, व्ही.एन नाईक संस्थेचे माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड , कारभारी काकड , कारभारी शिंदे , पंढरीनाथ काकड , बाजार समितीचे संचालक विश्वास नागरे , तानाजी जायभावे , मखमलाबाद सोसायटी माजी सभापती गोकुळ काकड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . यावेळी माजी खा.देविदास पिंगळे, कोंडाजी मामा आव्हाड , माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक गोकुळ काकड यांनी प्रास्तविकात मखमलाबाद गावातून अनेक हिरे घडले असल्याचे सांगून परंपरा जपणारे गाव असल्याचे सांगितले.यावेळी माजी खा.देविदास पिंगळे यांनी बॉलिंग करत व ना . भुजबळ यांनी बॅटिंग करत व्हीके मल्टिस्पोर्ट्स क्लबचे उद्घाटन केले . सूरज काकड , वैभव काकड , विशाल काकड , भारत थोरात यांनी ना.भुजबळ यांचे स्वागत करून सत्कार केला.

यावेळी महावितरण विभागाचे उपअभियंता बागुल व तलाठी बबनराव कोकाटे यांचा सत्कार ना. भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रमास सेन्ट्रल गोदावरी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पिंगळे , उपाध्यक्ष अनिल काकड , बाजार समितीचे संचालक तुकाराम पेखळे , नारायण काकड , बाळासाहेब पालवे , विक्रम काकड, नगरसेवक योगेश शेवरे , प्रमोद पालवे , प्राचार्य माणिक काकड , अंकुश काकड ,मखमलाबाद सोसायचीचे संचालक प्रल्हाद काकड , उपस्थित होते आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शंकरराव पिंगळे यांनी मानले .

- Advertisment -

ताज्या बातम्या