Tuesday, May 14, 2024
Homeनगरजिल्ह्यातील 49 सोसायट्यांचा बिगूल वाजला !

जिल्ह्यातील 49 सोसायट्यांचा बिगूल वाजला !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल लागोना लागतो तोच जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 49 सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी 22 पासून उमेदवारी विक्री आणि दाखल करण्यास सुरूवात झाली असून 27 तारखेपर्यंत यास मुदत आहे. निवडणूका होणार्‍या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक या श्रीगोंदा तालुक्यातील 13 असून संगमनेर तालुक्यातील 8 संस्थांचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात पूर्ण करण्याचे आवाहन सहकार विभागाकडे आहे. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक संपताच राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

यात 49 सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज विक्री आणि दाखल करणे, 1 मार्चला छानणी, 2 मार्चला उमेदवारांची यादी, 16 मार्चपर्यंत माघार आणि 17 मार्चला चिन्हाचे वाटप करण्यात येवून अंदाजे 26 ते 29 मार्च दरम्यान या निवडणूका पारपडणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यावर लगेच मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

या ठिकाणी आहेत निवडणूका

श्रीगोंदा : विठ्ठल सोसायटी निमगाव खलु, अजिंक्य काष्टी, भाऊसाहेब शिपलकर शिपलकरवाडी, सिध्दीनाथ सांगवी दु, श्री हंगेश्‍वर चिंबळे, शिवशंकर येवती, गव्हणेवाडी सोसायटी, श्री गणेश पिसोराखांड, श्री हनुमान भावडी, वडगाव शिंदोडी, पांडवगिरी निंबवी, भैरवनाथ माठ, शिरसगाव बोडखा सोसायटी यांचा समावेश आहे. संगमनेर : बिरेवाडी, वाघापूर, कौठे, धांदरफळ, मंगळापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, जाखुरी, कोंची. राहाता: बाबुराव कडू पाटील सोसायटी रुई, याळकी, माऊली गोदावरी शिंगवे, पुणतांबा, पुणतांबा विभाग बागीयतदार सोसायटी. राहुरी : चंडकापूर, निंभेरे, अंमलनेर. नेवासा : गोमलवाडी, मुकिंदपूर, नाथकृपा वाटापूर.शेवगाव : राणेगाव, लखमापुरी, ढोरजळगाव, अंतरावली, शेवगाव सोसायटी, ठाकूरपिंपळगाव आणि बक्तपूर. नगर : बाबुडी घुमट, मदडगाव, बाळेश्‍वर सोसायटी बाळेवाडी. पारेनर : काळकुप, वडनेरहवेली, घोणगाव-गटेवाडी सोसायटी, रुईछत्रपती आणि शहांजापूर यांचा समावेश आहे.

पुन्हा करोनाचे सावट

राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा करोनाचे सावट ओढावले आहे. अमरावती विभागाचे आयुक्त यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून अमरावती विभागातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकल्यांची विनंती केली आहे. नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा सहकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

पुढील आठवड्या बँकेच्या चेअरमनची निवड

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून निवडणून आलेल्या संचालकाची नावांची अधिसुचना गॅझेटमध्ये प्रसिध्द झाल्यावर सहकार विभाग राज्य सहकार निवडणूक यांच्या मान्यतेने आणि बँकेच्या घटनेनूसार संचालक मंडळाची अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी बैठक बोलविणार आहेत. पुढील आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता सहकार विभागाच्या सुत्रांनी वर्तवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या