Friday, April 26, 2024
Homeनगरबंडखोरांनी केलेली पदाधिकारी निवड अनेकांना अमान्य

बंडखोरांनी केलेली पदाधिकारी निवड अनेकांना अमान्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या काही असंतुष्ट पदाधिकार्‍यांनी बंडखोरी करून घेतलेली सभा व त्यामधील नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी संघटनेच्या घटनेला व नियमांना धरून नाहीत. त्यामुळे ती सभा अधिकृत नाही व निवड अवैध असल्याचा ठराव संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणी सभेत मंजूर करण्यात आला. पुढील 15 दिवसांत संघटनेची अधिकृत सर्वसाधारण सभा घेऊन पुढील दोन वर्षांसाठी संघाच्या घटनेनुसार नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात येणार असल्याचे लांडे यांनी दिली.

- Advertisement -

या कार्यकारिणी सभेला संघाचे माजी अध्यक्ष आबासाहेब कोकाटे, बी.पी.बोलगे, शिवाजीराव ढाळे, जिल्हा टिडीएफ अध्यक्ष अशोक नवल यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष हिरालाल पगडाल ऑनलाईन उपस्थित होते. सभेसाठी उपाध्यक्ष गोरक्षनाथ ठोंबळ, नानासाहेब सुद्रीक, सुभाष पानसंबळ, कोषाध्यक्ष जनार्धन पटारे, सहसचिव दिलीप ढवळे, जिजाबा हासे, गणेश तांदळे यांनी विचार मांडले.

याशिवाय माजी पदाधिकारी अण्णासाहेब वांढेकर, गजानन शेटे, भीमराज खोसे, सुरेश पाटील, सोमनाथ सुंबे, जिल्हा गणित संघटनेचे अध्यक्ष संजय निक्रड, नवनाथ घुले, सर्जेराव मते, प्रमोद तोरणे, रमजान हवलदार, सुधीर काळे, काकासाहेब देशमुख, लालचंद आसावा, शाहूराव औटी, राजेंद्र कळसकर, योगेश कुटे, भास्कर कानवडे, कल्याण ठोंबरे, धनंजय म्हस्के, सुनील जगताप, सुनील भुजाडी, कैलास थोरात, नानासाहेब नळे, संभाजी शेळके, दत्ता लांडे, रावसाहेब धुरपते, दत्रात्रय सस्ते, एम.एम.पाचपुते, साईनाथ माळी, व्ही.जी.जुंदरे, एस.एम.पाचपुते आदी उपस्थित होते. पुढील सभा होईपर्यंत सचिव म्हणून जिजाबा हासे यांनी कामकाज पहाण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. यापुढील पदाधिकारी निवडताना जुनी पेन्शन योजना पाहिजे, यासाठी लढा देणार्‍या तरुण शिक्षकांना संधी देण्याची मागणी माजी पदाधिकार्‍यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या