Saturday, April 27, 2024
Homeनगरमाजी अध्यक्षांकडून विरोधकांना सडेतोड उत्तर

माजी अध्यक्षांकडून विरोधकांना सडेतोड उत्तर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भाऊसाहेब ढोकरे यांच्या

- Advertisement -

अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. यावेळी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी विकास मंडळाच्या कारभारावर विरोधकांनी केलेल्या आक्षेपांना मुद्देसूद सर्व कागदपत्रे समोर ठेवून सडेतोड उत्तर दिले.

या ऑनलाईन सभेत उपस्थितांचे स्वागत खजिनदार संजय उदार यांनी केले. अध्यक्ष ढोकरे यांनी विकास मंडळाच्या मागील सालातील कामकाजाचा आढावा विस्तृत स्वरूपात प्रास्ताविकात घेतला. विकास मंडळाचे माजी अध्यक्ष शिंदे यांनी मंडळाच्या कारभारावर विरोधकांनी केलेल्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे दिली.

ठेवी वर्ग करण्याबाबत काही सभासद व विकास मंडळ पदाधिकार्‍यांनी उपनिबंधक कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवर जिल्हा उपनिबंधकांनी सुनावणी घेऊन शिक्षक बँकेचे व विकास मंडळाचे म्हणणे 2016 च्या सर्वसाधारण सभेतील ठरावाप्रमाणे ठेवी वर्ग करण्याबाबत बँकेला आदेश दिले.

परंतु बँकेने दाद दिली नाही. विश्वस्त मंडळाने बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी विरोधकांना बरोबर घेण्याचाही प्रयत्न केला. परंतु तरीही ठेवी वर्ग करण्याबाबत सत्ताधार्‍यांनी उदासीनता दाखवल्यामुळे विकास मंडळाचे बांधकाम बंद करावे लागले. जिल्ह्याला बरोबर घेऊन विकास मंडळाचे काम व्हावे, अशी पुन्हा एकदा अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

बँकेचे माजी चेअरमन रावसाहेब रोहोकले यांचे मनोगत यावेळी झाले. इब्टाचे सुभाष भिंगारदिवे, अखिल भारतीय संघाचे राजेंद्र निमसे व बाळासाहेब कदम यांनी विकास मंडळाच्या कामाचे कौतुक केले. प्रविण ठुबे यांनी आम्ही बँकेतील घडामोडी या केवळ विकास मंडळाचे काम मार्गी लागावे, या उद्देशाने केल्या होत्या. परंतु सत्ताधार्‍यांनी दिलेला शब्द पाळला नाही. उच्चाधिकारचे अध्यक्ष आर.पी.रहाणे, संजय दळवी, अविनाश साठे, कल्याण पोटभरे, राजाभाऊ पालवे, सुनंदा आडसुळ, मोहनराव राशिनकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

सभेस कल्याण कोकाटे, पांडुरंग खराडे, गोकुळ गायकवाड, सर्जेराव घोडके, बाबा पवार, बाळासाहेब रोहोकले, राजेंद्र ठुबे, गणेश वाघ, संतोष ढोले आदी उपस्थित होते. आभार गोरक्षनाथ देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन सचिव मच्छिंद्र कोल्हे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या