Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरजिल्हा मराठाला कृषी महाविद्यालय देऊ

जिल्हा मराठाला कृषी महाविद्यालय देऊ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कृषी महाविद्यालयांच्या 8 हजार जागांसाठी तब्बल 40 हजार अर्ज येतात, तर दुसरीकडे इंजिनिअरिंगच्या 75 हजार जागा रिक्त राहतात. त्यामुळे शिक्षणाचा कल बदलत आहे. अशा स्थितीत बदलते कृषी तंत्रज्ञान युवकांनी अंगिकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेने नव्याने कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव द्यावा, त्यास नवे सरकार तातडीने मंजुरी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महसूल मंत्रीपदी निवड झाल्याने जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेद्वारे मंत्री विखे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विखे पाटील म्हणाले, मी कृषी मंत्री असताना मुलींना शिक्षणात 30 टक्के आरक्षण दिले. परिणामी, मुलींनाही उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे. कृषी महाविद्यालयातून शिक्षणाचा असलेला ओढा हा केवळ राज्य व केंद्राच्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने आहे.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अनेक शाळांच्या जागा मान्यतेचे प्रस्ताव प्रलंबित आहेत व कृषी महाविद्यालयाची मंजुरीही मधल्या काळात थांबली आहे. पण आता जागा मान्यता प्रस्ताव तातडीने मार्गी लागतील व कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव नव्याने करून पाठवल्यास त्यास तातडीने मान्यता दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

1997-98 मध्ये कृषी मंत्री असताना प्रशासनातील किती अधिकारी शेती करतात, हे जाणून घेण्यासाठी राज्यभरातील 30 हजारांवर अधिकार्‍यांना फॉर्म पाठवून ते कोठे व कशी शेती करतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण माझे मंत्रीपद गेले तरी ते फॉर्म काही भरून परत आले नाहीत, असे त्यांनी सांगताच हास्यकल्लोळ उडाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या