जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना 25 कोटी 62 लाखांचा निधी

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2019 सालात जुलै ते ऑक्टोबर या काळात राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.

अशा राज्यातील बाधित शेतकर्‍यांना सप्टेंबर 2020-ऑक्टोबर 2020 मध्ये प्रत्येकी 153 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 25 कोटी 62 लाख रुपयांचा निधी आला आहे. यामुळे या बाधित शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

महसूलच्या परिपत्रकानुसार ज्या शेतकर्‍यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीककर्ज घेतले नाही, पण त्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे व पुरामुळे किमान 33 टक्के हानी झाली आहे. अशा शेतकर्‍यांना 1 हेक्टरच्या मर्यादेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार त्या त्या पिकासाठी अनुज्ञेय असलेल्या मदतीच्या दराच्या तिप्पट दराने येणारी रक्कम मदतीचे वाटप होणार आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार नगर जिल्ह्यातील बाधित शेतकर्‍यांना 1 हेक्टरच्या दरानुसार 1 हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटपासाठी वितिरीत करण्याचा निधी 8 कोटी 54 लाख 8 हजार रुपये आहे. दुप्पट दराने 17 कोटी 8 लाख 16 हजारांचा निधी असा एकूण 25 कोटी 62 लाख 24 हजारांचा निधी वाटप केला जाणार आहे.

प्रचलित नियमानुसार शेती, बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीकरिता मदत 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना अनुज्ञेय राहील. कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

मदतीचे रक्कम संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये यासाठी सहकार विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

ही मुदत वाटप करताना मागीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मधील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत वाटप केलेल्या शेतकर्‍यांना मदतीची द्विरूक्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *