Wednesday, April 24, 2024
Homeनगरजिल्हा विभाजनासाठी माजी खा. तनपुरेंना साकडे

जिल्हा विभाजनासाठी माजी खा. तनपुरेंना साकडे

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

योगायोगाने 12 डिसेंबरला राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशनही 7 डिसेंबरपासून होत आहे.

- Advertisement -

याचे औचित्य साधत महाविकास आघाडी सरकारने पंचेचाळीस वर्षांचा जिल्हा विभाजन प्रश्नाचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा. प्रायोगिक तत्वावर कमी खर्च येणार्‍या श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी, म्हणून माजी खा.प्रसादराव तनपुरे यांना श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्या अधिपत्याखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी श्रीरामपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष लकी सेठी, सहसमन्वयक भावेश ठक्कर, अजिंक्य झिरपे, विजय मुथा उपस्थित होते.

खा. पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेऊन सर्वांना बरोबर घेत सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन तनपुरे यांनी दिले. तनपुरे यांना समिती संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे मार्गदर्शनाने सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्याचा गोषवारा विषद करण्यात आला.

समिती अंतर्गत 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात श्रीरामपूर जिल्हा संकल्प अभियान राबविणार असल्याचेही सांगितले. पंचेचाळीस वर्षांचा जिल्हा विभाजन प्रश्न मार्गी लागावा. तसेच श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दि.17 ऑक्टोबर ते 12 डिसेंबरपर्यंत अनवाणी राहण्याचा संकल्प केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या