Monday, April 29, 2024
Homeजळगावया कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव

या कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव

 पाचोरा Pachora प्रतिनिधी

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pachora Bhadgaon Agricultural Produce Market Committee) निवडणूकीत (election) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी (Election decision officers) विद्यमान आमदारांच्या पॅनलला मदत होईल अशा हेतूने काम केले आहे. राजकीय दबावापोटी (political pressure) त्यांनी निवडणूकीत केलेल्या तक्रारींची कोणतीही दखल न घेता विद्यमान आमदारांच्या पॅनलतर्फे केलेल्या तक्रारींची त्वरीत दखल घेत त्यावर कार्यवाही केली. अशा पक्षपाती पणाचा विरोध व निषेध करण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधकांना (Election Officer and Deputy Registrar) घेराव घालण्याचा इशारा उध्दव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray group) नेत्या वैशाली सुर्यवंशी (leader Vaishali Suryavanshi) यांनी दिला आहे.

- Advertisement -

धावत्या ट्रकला लागली आग अन् पुढे झाले असे काही….

नुकतीच पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी तीन जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले. आणि विद्यमान आमदारांच्या पॅनलला सहाय्य करण्याच्या हेतूने घाईत निकाल जाहीर केले. त्याच्या विरोधात  जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे इलेक्शन पिटीशन दाखल केलेले आहे. असे असतांना जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर पक्षकारांना  कोणतीही नोटीस देखील काढलेली नाही.

मात्र आमदारांचे कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अपात्रता प्रकरणात मे. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतांनाही तातडीने नोटीस काढुन तडकाफडकी महाविकास आघाडी पनलचे  उमेदवार  उध्दव मराठे यांना अपात्र घोषीत करण्यासाठी सलग  जवळच्या तारखा देऊन पक्षपाती काम  करीत आहेत. 

VISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच…

अपात्रता अर्जावर पक्षाकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता जवळच्या तारखा देणारे जिल्हा उपनिबंधक यांची सत्ताधाऱ्यांशी  बांधीलकी दर्शविते. नैसर्गिक न्यायतत्वाने न वागणाऱ्या जळगाव जिल्हा सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक श्री. बिडवाई यांचा जाहीर निषेध करीत आहोत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल असलेल्या इतर तक्रारी व त्याचे चौकशीच्या प्रकरणात अद्याप चौकशी न करता प्रकरणे प्रलंबीत ठेवलेली आहेत.

त्याची साधी चौकशी देखील त्यांनी केलेली नसून राजकीय दबावात पक्षपाती आणि पारदर्शक काम न करणारे जिल्हा उपनिबंधक श्री बिडवाई यांची चौकशी करण्यात यावी. जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या