Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा जाहीर

जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यासाठी ( Nashik District ) 23 हजार कोटींचा पतपुरवठा आराखडा( Credit Plan) जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.)यांनी प्रसिद्ध केला.यंदा त्यात 672 कोटींची वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात गंगाथरण डी., अग्रणी बँक अधिकारी पाटील, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, पवार आदी उपस्थित होते. गेल्यावर्षी 22 हजार 600 कोटी रुपयांचा पत आराखडा होता. यंदा त्यात 672 कोटींची वाढ झाली आहे.

तो 23 हजार 272 कोटींचा झाला आहे. त्यात कृषी व कृषी पुरक व्यवसायासाठी 2,581 कोटी, फक्त कृषी विकासासाठी 6,231 कोटी, उद्योगांसाठी 6,523 कोटी, इतर छोट्या मोठ्या कुटीर उद्योगासांठी 4,325 कोटी, प्राधान्य क्षेत्रासाठी 17,079 कोटी व इतर सर्वसाधारण क्षेत्रातील उद्योगधंद्यासाठी 6,193 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

साधारणत: दोन ते तीन टक्के प्रत्येक क्षेत्रात यंदा पतपुरवठा वाढविला आहे. त्यामुळे भविष्यात नाशिकच्या कृषी औद्योगिक वृध्दीसाठी मोठा हातभार लागणार आहे.

गेल्या वर्षी असेच उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यात कृषी अकृषीक क्षेेत्रात 90 टक्के अंमलबजावणी झाली होती. इतर क्षेत्रात मात्र 28टक्केच उद्दिष्ट साध्य झाले होते. एकुण सरासरी 83टक्के निधी वितरीत झाला होता.

यंदा सर्वच बँकांना जिल्हाधिकारी यांनी गावागावात जाऊन प्रचार-प्रसार करण्याचे व कर्ज मेळावे घेऊन कर्ज वितरण करुन शंंभर टक्के अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत. आता सरकारी बँका त्यात कितपत कर्जदारांपयर्ंंत जातात व त्यांंना कर्ज वितरीत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या