Saturday, May 11, 2024
Homeनगरजिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरू

जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या वाढत्या संकटांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मदतीकरता कृतिशील उपायोजना केल्या आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील करोना रुग्णांना तातडीने मदत मिळणे करिता संगमनेर येथील यशोधन कार्यालयात 24 तास कार्यरत अशी हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

- Advertisement -

यशोधन मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याहस्ते अहमदनगर जिल्हा करोना मदत व सहाय्यता केंद्र या करोना वॉर रूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अहमदनगर शहर अध्यक्ष किरण काळे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, शहराचे युवक अध्यक्ष निखिल पापडेजा, प्रा. बाबा खरात, नवनाथ महाराज आंधळे, सचिन खेमनर, पी. वाय. दिघे, विजय हिंगे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, करोना संकटात काँग्रेस पक्षाने श्रीमती सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर अत्यंत प्रभावी काम केले आहे. राज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षीही आणि यावर्षी सुद्धा काँग्रेस पक्ष पक्षातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जनतेला मदत करत आहेत. ना. थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यातील करोना रूग्णांसाठी ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करणे, औषधांची उपलब्धता करणे, शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी बेड उपलब्ध करणे, याचबरोबर करोना रुग्णांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये 500 बेडचे अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे.

प्रत्येक तालुक्यात सातत्याने आढावा घेऊन करोना रुग्ण कमी करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला व कार्यकर्त्यांना सूचना देऊन क्रियाशील बनवले आहे. या 24 तास हेल्पलाईन केंद्रामुळे विविध तालुक्यांतील करोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साथी बेड, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्धते साठी मदत मिळवणे, रुग्णवाहिका, प्लाजमा साठी मदत, रुग्णांसाठी औषधे मिळवणे अशा विविध सुविधांसाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे. या वॉर रूम मधून 24 तास मदत सुरू राहणार असून यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी मदतीकरिता प्रशिक्षित चार व्यक्ती कार्यरत राहणार असून प्रत्येक तालुक्यासाठी संगणका सह त्यासंबंधी तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, त्यांचे फोन नंबर, तेथील बेडची व्यवस्था, संपर्क व मदत यंत्रणा, प्रशासन अधिकारी, करोना योद्धे या बाबतची अद्ययावत माहितीसह स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांसाठी 9370589017, व 8446525901 तर नगर, राहुरी, अहमदनगर शहराकरता 9370693309, व 9370577868 तसेच कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यांत करिता 9370841417 व 9370839096 आणि पाथर्डी, शेवगाव, नेवासा व श्रीरामपूर या तालुक्यात करता 9370682375 व 9370877503 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या