Saturday, April 27, 2024
Homeनगरडॉ.तनपुरे साखर कारखानाच्या गाळपास जिल्हा बँकेचा हिरवा कंदील

डॉ.तनपुरे साखर कारखानाच्या गाळपास जिल्हा बँकेचा हिरवा कंदील

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना गाळप हंगामास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने मासिक बैठकीत परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

डॉ. तनपुरे कारखाना यावर्षी पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेची परवानगी मिळावी, यासाठी कारखाना संचालक मंडळाने माजी आ. कर्डिले यांची भेट घेतली होती. कारखाना सुरू करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचे नेहमीच सहकार्य आहे आणि भविष्यात देखील राहील, असे आश्‍वासन कर्डिले यांनी दिले होते. जिल्हा बँकेच्या बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बँकेच्या परवानगीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेची गाळप हंगामास परवानगी मिळाल्याने कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण करता येणार असून मागील वर्षी तांत्रिक अडचणींमुळे कारखाना कमी दिवस चालला. त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाचे ऊस तोड न मिळाल्याने हाल झाले. ते यावर्षी होऊ नये, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

जिल्हा बँकेने कारखाना सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करून हा कारखाना चालू रहावा, तो सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांचे सर्व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारखान्याचे दुरुस्तीचे सर्व कामे पूर्ण करून आगामी गाळप हंगामात सर्व सभासद शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे कारखाना संचालक रवींद्र म्हसे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या