Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा बँक निवडणूक : भाजपाचा स्वबळाचा नारा

जिल्हा बँक निवडणूक : भाजपाचा स्वबळाचा नारा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Central Co-operative Bank) पंचवार्षिक निवडणुकीच्या (Five-year election) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ऐनवेळी सर्वपक्षीय पॅनल मधील काँग्रेसपाठोपाठ (Congress) राष्ट्रवादीने (NCP) देखील भाजपसोबत (BJP) लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची भुमिका माजी मंत्री आ. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी जाहीर केली. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलसह निवडणूक बिनविरोध (Unopposed) होण्याची आशा आता पुर्णपणे मावळली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु झाली आहे. चारही पक्षाकडून निवडणुकीची तयारी केली जात असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठी सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली होती. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सर्वपक्षीय पॅनलच्या कोअर कमिटीच्या बैठका देखील पार पडल्या. या बैठकांमध्ये चारही पक्षांमध्ये जागा वाटपचा निर्णय झाला होता. मात्र काँगे्रसह राष्ट्रवादीने जागा वाटपांचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात टोलावला होता.

दरम्यान, काँग्रेसने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना राष्ट्रवादीकडून देखील भाजपसोबत लढण्यास नकार दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहात पार पडली. या बैठकीला खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन, जि.प. शिक्षण सभापती रवींद्र पाटील, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, माजी शिक्षण सभापती पी. सी. पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, सुरेश धनके, भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

परिस्थितीनुसार भूमिका घेणार

सर्वपक्षीय पॅनलमधील काँग्रेससोबत राष्ट्रवादीने देखील भाजपसोबत निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.त्यामुळे भाजप संपुर्ण 21 जागांवर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची भूमिका आ. गिरीश महाजन यांनी घेतली आहे. तसेच भाजप शिवसेनेला युतीबाबत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील काळात ज्याप्रमाणे घडामोडी घडतील त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. तसेच सर्व जागांवर उमेदवारांची चाचपणी देखील झाली असल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधतांना आ. गिरीश महाजन यांनी दिली.

महाविकास आघाडीकडून सोयीच राजकारण

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सर्व पक्षीय पॅनलच्या बैठकी झाल्या. या बैठकीत काँग्रेससह राष्ट्रवादीने सर्व अलबेल असल्याचे सांगितले आणि ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस शिल्लक असतांना भाजपसोबत लढण्यास वरिष्ठांनी नकार दिल्याचे सांगतले असल्याचे माजी आ. महाजन यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसने आधीच सर्वपक्षीय पॅनल तयार करायला नव्हत होत. त्यांनी ऐनवेळी यू-टर्न घेतल्याने महाविकास आघाडीकडून सोयीच राजकार केली जात असल्याची टीका माजी आ. गिरीश महाजन यांनी केली.

रा.काँ.कडून गाफिल ठेवण्याचे काम

काँग्रेसने भुमिका जाहीर केल्यानंतर सर्वपक्षीय पॅनलमधील इतर पक्षांनी देखील आपली भुमिका जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रवादीकडून बैठकीत वरिष्ठांसोबत आमचे बोलणे सुरु असून पॅनलला हिरवा कंदील असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात होते. एकीकडे आम्हाला गाफिल ठेवायच आणि ऐनवेळी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपसोबत लढण्यास नकार दिल्याची भूमिका जाहीर केल्याचे सांगत राष्ट्रवादीने आतापर्यंत गाफील ठेवण्याच काम केले असल्याची टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या