Sunday, May 5, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा बिगुल वाजला

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

तब्बल वर्षभरापासून प्रतिक्षा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्था सभासदांचे ठराव मागविण्याचा कार्यक्रम जिल्हा सहकरी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिंबधक यांच्याकडून जाहीर करण्यात आला.

- Advertisement -

त्यानुसार १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव मागविण्यात आले आहे. जिल्हयातील १ हजार ८८२ सहकारी संस्थांची मुदत संपल्याने गेल्यावर्षी या संस्थांची निवडणूक घेण्याची तयारी केली होती. मात्र, करोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च अखेरीस या संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. तीन वेळा स्थगित करण्यात आलेल्या या संस्थांचा निवडणुक घेण्याचे आदेश राज्य सरकारने २ फेब्रुवारी रोजी दिले.

यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह १ हजार ८८२ संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी पहिल्या टप्प्यात राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम १५ पासून सुरू करण्याचे आदेश दिले.

यात जिल्हयामधील ५८ संस्थांचा समावेश आहे. या सहकारी संस्थांचा कार्यक्रम जाहीर होत नाहीतोच गुरूवारी (दि.११) जिल्हा बँकेच्या संचालकमंडळ सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्था सभासदांचे ठराव मागविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. याबाबत जिल्हा सहकारी निवणूक अधिकारी यांनी वर्तमानपत्रात हा कार्यक्रम घोषीत केला.

त्यानुसार प्राधिकरणाने २३ डिसेंबर २०१९ रोजीच्या मतदार यादीच्या दिलेल्या कार्यक्रमात सुधारण करून २७ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधींचा ठराव मागविण्यात येत आहे.यााकरिता १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२१ या ५ दिवसांचा कालावधी (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) देण्यात आला आहे. या कालावधीत बँकेच्या संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव दाखल करावयाचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या