Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedअत्याचारी बापाला २० वर्षे सक्तमजुरी

अत्याचारी बापाला २० वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद – aurangabad

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंबार अत्याचार करुन तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधम पित्याला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १ लाख ४१ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी (District and Sessions Judge K.R. Chaudhary) यांनी ठोठावली.

- Advertisement -

या प्रकरणात १५ वर्षीय पीडितेने फिर्याददिली होती. त्यानुसार, पीडिता ही आई, वडील व भावासोबत राहत होती. तर तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असल्याने ती सासरी राहत होती. ४ मार्च २०१९ रोजी पीडितेच्या नराधम पित्याच्या भावाचा नातू वारल्याने त्याने पीडितेच्या आई आणि भावाला औरंगाबाद येथे पाठवले होते. त्यावेळी घरी नराधम पिता आणि पीडिता असे दोघे होते. नराधमाने संधी साधून दोन दिवस पीडितेला मारहाण करुन बळजबरी अत्याचार केला.

६ मार्च २०१९ रोजी पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितला, तेव्हा थोडा दम मार, मी करते काहीतरी, असे सांगून आईने वेळ मारुन नेली. नंतर ८ मार्च २०१९ रोजी नराधमाने पीडिता व तिच्या भावाला घरा बाहेर झोपायला सांगितले. मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन वाजेच्या सुमारास नराधमाने पीडितेचे तोंड दाबुत गप्प रहा, अशी धमकी देत तिला घराच्या बाजूच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार देखील पीडितेने आईला सांगितला असता तिने रडत-रडत काहीतरी करते म्हणून पुन्हा वेळ मारुन नेली. घटनेच्या चार-पाच दिवसानंतर पीडिता, तिची आई, नराधम पिता आणि भाऊ असे चौघे गावातील एकाच्या शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये देखील या नराधम बापाने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार असा प्रकार घडत राहिला.

बहिणीने घेतला पुढाकार

बापाकडून वारंवार अत्याचार होऊन तो वारंवार आईला सांगूनही आई ही काहीच करत नसल्याने पीडितेने घडत असलेला प्रकार लग्न झालेला बहिणीला फोनवरून सांगितला. बहिणीने हा प्रकार मामाला सांगितला. त्यानुसार १८ एप्रिल २०१९ रोजी मामा पीडितेच्या घरी आला. त्यानंतर पीडिता, तिची आई आणि भावाने सोयगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या