Friday, April 26, 2024
Homeनाशिकआठवडे बाजारात मास्कवाटप

आठवडे बाजारात मास्कवाटप

कळवण | प्रतिनिधी

राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने आठवडे बाजार बंद होऊ नये, म्हणून आठवडे बाजार संघटनेतर्फे आज कळवणच्या आठवडे बाजारात व्यापारी व ग्राहकांना मास्क वाटप करण्यात आले. बाजार ठिकाणी येणार्‍या सर्वानाच मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

कोविड 19 मुळे तालुक्यातील कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, देसराणे, मोकभणगी, बेज, ओतूर येथील आठवडे बाजार मार्च ते ऑकटोबर असा आठ महिने बंद होता. आठवडे बाजारात अनेक प्रकारचे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिक आहेत. यात भाजीपाला, भांडे, कपडे, मसाले व इतर प्रकारचे व्यवसाय येतात. या व्यावसायिकांकडे उपजीविका भागविण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नसल्याने लॉकडाऊन काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.

मात्र ज्या व्यापार्‍यांची गावात दुकाने आहेत. त्यांनी लॉकडाऊन काळातही दुकानाचे शटर खाली करून व्यवसाय केला होता. त्यांना लॉकडाऊन काळात त्यांना आर्थिक चणचण जाणवली नव्हती मात्र आठवडे बाजारातील विक्रीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेक व्यापार्‍यांवर आपल्याकडे असलेले किडुकमिडुक जमापुंजी विकून उपजीविका भागवावी लागली होती. तर अनेकांचे बँकेचे हप्ते थकले होते.

आता कुठंतरी त्यांचे व्यवसाय सुरळीत सुरु झाले होते. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून व्यापारी व ग्राहकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे. आज आठवडे बाजार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी आठवडे बाजारातील व्यापारी व ग्राहकांना मास्कचे वाटप केले व सर्वाना मास्क वापरण्याचे आवाहन करीत ग्राहकांनी स्वतः सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी आठवडे बाजार व्यापारी संघटनेचे कळवण तालुका अध्यक्ष बापू पगार, उपाध्यक्ष चंद्रकांत आप्पा बुटे, बाबा मालपुरे, सागर कापडणे, दुर्गेश ग्रामस्थासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मागील लॉकडाऊनमुळे आठवडे बाजारात व्यवसाय करणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती. आपल्या भागात कमी रुग्ण असल्याने नागरिकांनी वेळीच सावध होत. मास्कचा वापर करून सोशल डिस्टनचे पालन करावे व व्यापार्‍यांना सहकार्य करावे.

बापू पगार – अध्यक्ष आठवडे बाजार संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या