तळोदा तालुक्यातील विविध गावात खावटी किटचे वाटप

बोरद Board ता. तळोदा | वार्ताहर

तळोदा Taloda तालुक्यातील बोरद व खरवड येथे महाराष्ट्र सहकारी आदिवासी महामंडळ Maharashtra Co-operative Tribal Corporation व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प Integrated Tribal Development Project अंतर्गत आदिवासी समाजाला खावटी अनुदान योजना शासनाने Khawati grant scheme सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना जि. प अध्यक्ष ऍड.सीमा वळवी ZP President Sīmā vaḷavī यांच्या हस्ते खावटी किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि. प अध्यक्ष ऍड.सीमा वळवी म्हणाल्या की, १९७८ पासून आदिवासी समाजाला खावटी योजना सुरू आहे. मात्र मागील भाजप सरकारने ही योजना बंद केली होती. आताच्या महाविकास आघाडी सरकारने ती पुन्हा सुरू केली यात कॉंग्रेस पक्ष ही सामील असल्यामुळे आपल्या जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री मंत्री ऍड. के.सी पाडवी याच्या प्रयत्नाने आता ही योजना पुन्हा सुरू केली आहे.

आधार कार्ड हे कॉंग्रेस पक्षाने दिले होते. आधारकार्ड मुळे कॉंग्रेसने आपल्याला ओळख दिली.ही कॉंग्रेस पक्षाची देण असून कॉंग्रेस पक्ष हा गोर गरिबांचा विचार करणारा पक्ष आहे. या योजनेने आदिवासी समाजाला आधार मिळाला आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी बोरद येथील ५५३ तर खरवड येथील १४४ लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि. प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी,निशा वळवी,तळोदा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहिदास पाडवी, बोरदच्या माजी सरपंच वासंती ठाकरे, माजी जि. प सभापती नरहर ठाकरे, माजी पं. स उपसभापती नंदूगिर गोसावी, माजी प. स.सदस्य सीताराम राहासे, प. स.सदस्य चंदन पवार, सुकलाल ठाकरे, रवींद्र वरसाळे,सचिन रहासे, माजी जि. प सदस्य इंदिरा चव्हाण, दयानंद चव्हाण व तसेच खरवड येथे माजी उपसरपंच वंदना गोसावी, शिवदास मोरे, ग्रा. प.सदस्य रेखाबाई शिरसाठ, सुरेश भील, व तसेच कोणीही खावटी किट पासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांनी परिश्रम घेतले.

ढेकाठी येथेही खावटी वाटप

तळोदा तालुक्यातील ढेकाठी येथे लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजना शासनाने सुरू केली आहे. यात अन्नधान्य,कडधान्य व इतर जीवनावश्क वस्तूचे वाटप करण्यात येत. यामुळे आदिवासी समाजातील गरजू व्यक्तींना याचा शासनातर्फे आधार मिळाला आहे. तळोदा तालुक्यातील ढेकाठी येथे त्यांच्या हस्ते खावटी योजनेच्या लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप जि. प अध्यक्ष ऍड.सीमा वळवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, प. स सदस्य सोनीताई पाडवी, सरपंच लहू पाडवी, उपसरपंच जगन्नाथ पाडवी, राजकुमार पाडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *