Thursday, April 25, 2024
Homeनगरसात लाखांहून अधिक अन्नपाकिटांचे वाटप

सात लाखांहून अधिक अन्नपाकिटांचे वाटप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना लॉकडाऊन काळात शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेऊन 25 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने

- Advertisement -

केलेल्या सात लाखांहून अधिक अन्नपाकिट वाटपाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

याबाबत मंत्री देशमुख यांनी ट्विट केले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेऊन 25 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लॉकडाऊनकाळात सात लाखांहून अधिक अन्नपाकिटांचे वाटप करत नागरिकांना सर्वोपरी मदत केली.

अहमदनगर पोलीस दल व स्वयंसेवी संस्थांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असे देशमुख यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मदतकार्याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

करोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले. हातवर पोटभरणार्‍या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी शहर व परिसरातील 25 स्वयंसेवी संस्था पुढे आल्या.

घर घर लंगर, आनंदधाम फाउंडेशन, समस्त जैन समाज, लालटाकी सेवा मंडळ, बन्सी महाराज अन्नपूर्ण सारख्या 25 स्वयंसेवी संस्था मदतीला धावल्या. मदतीचे हजारो हात पुढे आल्यानंतर शहर पोलिसांचे आत्मबल वाढले.

तत्काळील प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, सध्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या सहकार्यांनी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने गोरगरीबांना सात लाखांहून अधिक अन्न पाकिटांचे वाटप केले.

अन्न पाकिटांबरोबरच मुक्या जनावरांना चारा, भाजलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी मदत, गरजवंत महिलांसाठी सखी किटचे वाटप, झोपडपट्टीतील मुलांसाठी कंपासपेटी, वह्यांचे वाटप त्यांनी केले.

या कामाची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत उपअधीक्षक मिटके यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या