Sunday, April 28, 2024
Homeनाशिकगरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कालिका देवी मंदिर संस्थांनच्या (Kalika Devi Temple Trust)वतीने नाशिकमधील गरजू महिलांना आणि गरजूसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना धान्य, साडी आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकी १०० किलो तांदूळ, १०० किली गहू साडी आणि ब्लँकेट या वस्तूंचा समावेश होता.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये दहा दिवस ज्या महिलांनी अथक मेहनत घेवून प्रचंड गर्दीच्या वेळी हा नवरात्राचा महोत्सव आणि दसरा मेळावा सुरळीतपणे पार पडण्यामध्ये मोलाची भूमिका पार पडली अश्या महिला, सफाई कामगार गरजू महिला तसेच या गरजू महिला, निराधार आणि वृद्ध महिला यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांना प्रमुख विशेष निमंत्रित आथिती नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त मा. टी. एन. अकाली. नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिफ्ते, दैनिक भ्रमरचे संस्थापक संपादक चंदूलाल शहा, मोहित नारंग यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या संस्थांमध्ये गाडगे महाराज धर्मशाळा, रिमांड होम, अक्षय फौंडेशन, मदर तेरेसा प्रेमदान संस्था, प्रबोधिनी ट्रस्ट, पडसाद कर्ण-बधिर संस्था, वात्सल्य वृद्धाश्रम, आधार आश्रम संस्था, नाशिक या संस्थांच्या बरोबर १०२ गरजू महिला, सफाई कामगार यांचा समावेश होता.

या प्रसंगी कालिका मंदिर संस्थांनचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया. सचिव डॉ. प्रतापराव कोठवळे, संचालक दत्ता पाटील, आबासाहेब कोठवळे, योगेश कोठवळे, संतोष कोठवळे, विशाल पवार, किशोर कोठवळे, दिलीपराज सोनार, राम पाटील, भरत पाटील, दीपा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना धर्मादाय आयुक्त टी. एन. अकाली यांनी सांगितले की कालिका मंदिर ट्रस्टचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कालिका देवी मंदिर ट्रस्टने अश्या गरजू महिलांची आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची जाणीव ठेवून त्यांची दखल घेतली आणि अश्या प्रकारे मोलाची मदत दिली ही फार महत्वाची बाब आहे. अश्या कार्याची इतर सामाजिक संस्थानीही दखल घेऊन अश्या प्रकारे गरजूंना मदतीचा हात द्यावा असे नमूद केले. यावेळी केशव अण्णा पाटील यांनी सांगितले की कालिका देवी मंदिरच्या वतीने धार्मिक उपक्रमाबरोबरच आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही गेली अनेक वर्षे वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत असे सांगितले आणि या उपक्रमामध्ये ज्या ज्या संस्थांनी मदत केली त्यां सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दुधारे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या