Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात १ हजार ३६२ कोटींचे पीक कर्ज वाटप

जिल्ह्यात १ हजार ३६२ कोटींचे पीक कर्ज वाटप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने लोटले असून पीक कर्ज वाटप कासवगतीने सुरू आहे. या प्रकरणी अग्रणी बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेसह चार बँकांना असमाधानकारक कामगिरीमुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३६२ कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

खरीप हंगामात शेतकर्‍यांना पेरण्या करता याव्या, यासाठी बी-बियाणे व खते खरेदीसाठी जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वाटप केले जाते. यंदा खरीप हंगामासाठी बँकांना ३ हजार ३०० कोटींचे कर्ज वाटप उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अग्रणी बँकेचे अधिकारी दिलीप सोनार, राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खरीप पीक कर्ज वाटपात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी चालू आठवड्यात कर्जवाटपाचे चांगले काम केले असून त्यांना 105.94 कोटी एवढे उद्देश देण्यात आले होते. त्यापैकी या बँकेने ६२. ०७ कोटी रुपये इतक्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तसेच चालू आठवड्यात एच. डी. एफ.सी. बँक, कोटक बँक, यु. बी. आय. बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँकानी कर्ज वाटपाबाबतचे कामकाज असमाधानकारक असल्याने त्यांना अग्रणी बँक व्यवस्थापकांनी नोटीस देण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी केली.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनामधील लाभार्थ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप केले असून या सर्व बँकानी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर कर्ज वाटपाची सूचना मांढरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या