Thursday, April 25, 2024
Homeनगरअपात्र घोषित शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढा

अपात्र घोषित शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

12 व 15 फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये अपात्र घोषित केलेल्या शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून, अनुदानासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविले आहे.

- Advertisement -

12 व 15 फेब्रुवारीच्या शासन निर्णय अन्वये बिंदूनामावली व शैक्षणिक सत्र 2018-2019 मधील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी संख्या तसेच अन्य त्रुटींच्या पूर्ततेसाठी शाळांना अनुदानासाठी अपात्र घोषित केले. संबंधित शाळांनी निर्देशित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून शासनाकडे प्रस्ताव सादर केले. शासनाने या प्रस्तावांची छाननी व तपासणी सुद्धा केली. परंतु छाननी व तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या शाळांची यादी घोषित केली नाही.

तसेच छाननी व तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या शाळांची विभागस्तरावर तपासणी करण्याचे घोषित केले. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु करोना संकटाच्या कारणामुळे विभागस्तरावरील तपासणी तहकूब केली. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनिश्चितता निर्माण होऊन संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तर आमदार गाणार यांनी सदर प्रश्नी 14 मे रोजी पत्र देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने खेद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या