Thursday, April 25, 2024
Homeनगरगावातले वाद गावात मिटविणे चांगली बाब

गावातले वाद गावात मिटविणे चांगली बाब

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

गावातले वाद गावात मिटविले जाणे ही चांगली बाब आहे, असे प्रतिपादन राहाता न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश आदिती आर. नागोरे (Judge Aditi R. Nagore) यांनी केले.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे विधी सेवा समिती कोपरगाव अंतर्गत राहाता न्यायालय व राहाता वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना श्रीमती नागोरे बोलत होत्या. याप्रसंगी उपसरपंच गायत्री जेजूरकर, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ, अ‍ॅड. पंकज लोंढे, अ‍ॅड. प्रविण सापते, अ‍ॅड. संतोष लोंढे, बाजार समितीचे संचालक वाल्मिकराव गोर्डे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोर्डे, निवास त्रिभुवन, महेंद्र जेजूरकर, नंदकुमार गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, बाबुराव लोंढे, संजय चोळके, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, राहुल पोकळे, गणपत पठारे, कुंडलिकराव तरकसे, सचिन जेजूरकर, संदीप जेजूरकर, सतीश आत्रे, शरद त्रिभुवन आदी यावेळी उपस्थित होते.

न्या. श्रीमती नागोरे म्हणाल्या, गावातले वाद गावातच मिटावेत ही संकल्पना गावागावांत रुजविण्याची अशी आहे. कायदा काय आहे? निव्वळ न्यायालयात येऊनच तंटे मिटतात असे नाही. जसे गावात तंटामुक्तीचे अध्यक्ष गावात बसून आपापसात तंटे मिटवितात. त्याप्रकारची पध्दत न्यायालयात सुध्दा राबविली जाते. त्याला मध्यस्थ म्हणतात किंवा लोकन्यायालय म्हणतात. तुमचे कुठलेही खटले दाखल होण्यापुर्वीच मिटविले जातात. दोन्ही बाजूच्या पक्षकारांना बोलावून मध्यस्थी न्यायाधीश किंवा पंच आम्ही बसवतो. आणि वाद मिटतो.

यामुळे यातून परिश्रम, आर्थिक झळ अथवा मानसिक त्रास होणार असतो तो यामुळे होणार नसतो. तुमचा वेळ वाचतो. न्यायालयाच्या भाषात त्याला डिक्री म्हणतात. त्याच्यापुढे त्याला अपिल नाही किंवा काही नाही. तो वाद तिथे मिटविला जातो. सर्वांना समसमान न्याय देण्याचा प्रयत्न तिथे होत असतो. न्यायालयात साक्षी पुरावे, कागदपत्रे दिले जातात. ते सर्व विचारात घेऊन आम्ही निर्णय देतो. पण तेथे एक पक्ष कुणीतरी दुखावला जातो. म्हणून तो पुन्हा अपिलात जातो.

प्रास्तविक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल शेजवळ यांनी केले. त्यांनी या कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी अ‍ॅड. पंकज लोंढे, अ‍ॅड. प्रविण सापते, वाल्मिकराव गोर्डे, दशरथ गव्हाणे, संतोष गोर्डे, आदींची यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सापते यांनी केले तर आभार अ‍ॅड. संतोष लोंढे यांनी मानले. यावेळी मारुती मंदिरासमोर ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या