Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसौंदर्यीकरणाच्या नावाखाली गोदेचे विद्रुपीकरण

सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गोदेचे विद्रुपीकरण

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा घाटावर फरशी बसवण्याचे काम सुरु असून त्यामुळे गोदेचे सौंदर्यीकरण होण्याऐवजी विद्रुपीकरण अधिक होईल असा आरोप गोदाप्रेमींनी केला आहे. पावसाळ्यात गोदेच्या पुरात या फरश्या वाहून जातील व सर्व पैसा पाण्यात जाईल असा आक्षेप गोदाप्रेमींनी नोंदवला आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरण करण्याचे काम सुरु असून त्यासाठी कोटयवधीचे कामे हाती घेण्यात आली आहे. पण सुशोभिकरणाऐवजी गोदेचे विद्रुपीकरण अधिक होत असल्याचे समोर येत आहे. गाळ काढण्याच्य‍ा नावाखाली नदीपात्रातून सरार्स वाळू उपसा सुरु आहे. आता स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठावर फरशी बसविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी गुजरातहून मजूर बोलाविण्यात आले आहे.

मात्र फरशी बसविण्याचे काम अगदी तकलादू पध्दतिने होत असून गोदा सुशोभिकरणाच्या नावाखालि अनावश्यक उधळपट्टी सुरु असल्याचा आक्षेप गोदाप्रेमींनी घेतला अाहे.

ज्या पध्दतिने सिमेट क्राॅकिटवर या फरश्या बसवल्या जात आहे ते बघता महापुरात हे लाखो रुपयांचे काम वाहून जाईल, असे गोदाप्रेमींचे म्हणने आहे. मार्चएंडपर्यंत निधी खर्चकरण्यासाठी स्मार्ट सिटिकडून हा पैशाचा अपव्यय सुरु असल्याचा आरोप गोदाप्रेमींनी केला आहे.

फरशी बसविण्याचे काम तकलादू पध्दतिने सुरु आहे. छोटया मोठया पूरात या फरशा उखडून जातील. सुशोभिकरणा ऐवजी गोदेचे विद्रुपीकरणाचे काम स्मार्ट सिटिकडून सुरु आहे.

सागर काबरे, गोदाप्रेमी

मार्चएंड अखेर निधी खर्च करण्यासाठी ही धडपड सुरु आहे. मुळ स्मार्टसिटीच्या डिपीआरमध्ये या कामाचा समावेश नाही. मनमर्जी पध्दतिने स्मार्टसिटि काम करत आहे.

देवांग जानी, गोदाप्रेमी

- Advertisment -

ताज्या बातम्या