Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिव्यांग विद्यार्थी करणार जागतिक विक्रम

दिव्यांग विद्यार्थी करणार जागतिक विक्रम

नाशिक । प्रतिनिधी

डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन व हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम या कलाम कुटुंबियांनी चालवलेल्या संस्थेने डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडविण्यासाठी जगामध्ये पहिल्यांदाच एक महान उपक्रम हाती घेतला आहे.

- Advertisement -

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च चॅलेंज 2021 असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. व सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्टिफिकेट मिळणार आहे.

भारत देशातून 1000 विद्यार्थ्यांकडून शंभर लघुग्रह तयार करून घेऊन अवकाशात सोडणे व त्यांचे कार्य कसे चालते याचे निरीक्षण करणे असे या उपक्रमाचे स्वरुप असुन या उपक्रमात महाराष्ट्रातून एकूण 354 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यापैकी दहा हजार रुपये फी भरून 202 विद्यार्थी व 152 विद्यार्थी मोफत स्पॉन्सर मार्टिन ग्रुप यांच्याद्वारे सहभागी झाले आहेत.

त्यामध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून दहा दिव्यांग विद्यार्थी मोफत सहभागी झाले आहे. त्यापैकी महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयातील 9 कर्णबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यांना विशेष शिक्षिका अर्चना कोठावदे, वर्षा काळे, सुजाता राजेभोसले शिक्षकवृंद मुख्याध्यापक संतोष पाटील, महाराष्ट्र समाज सेवा संघाचे पदाधिकारी मार्गदर्शन करीत आहेत.

या प्रकल्पासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक रवींद्र परदेशी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विजय पाटील, सहाय्यक सल्लागार कैलास उईके, राष्ट्रीय पातळीवरून संस्थेचे सचिव मिलिंद चौधरी तर संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनिषा चौधरी या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या