Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारचिनोदा परिसरात टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव : शेतकर्‍यांकडून फवारणी

चिनोदा परिसरात टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव : शेतकर्‍यांकडून फवारणी

चिनोदा । Chinoda । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदा (Chinoda) परिसरात लागवड करण्यात आलेल्या टरबूज पिकावर (watermelon crop) भूरी या रोगाचा प्रादुर्भाव ()Disease outbreak झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकर्‍यामध्ये (farmers) चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍याकडून फवारणी (Spraying) करण्यात येत असून टरबूज पिकावर भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने टरबूज उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

टरबूज पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यत शेतकर्‍यांना मोठा आर्थिक खर्च येत असतो. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पाऊस तसेच सध्या वातावरणातील गारठ्यामुळे टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज शेतकर्‍याकडून वर्तविण्यात येत आहे. भूरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील रस शोषला जाऊन त्यामुळे पाने वाकडी होत असून संपूर्ण पाने पांढरी होत असल्याने शेतकर्‍याकडून खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी करण्यात येत आहे.

पाडळसरेत देव खोपडीत ठेवून पूजन

टरबूज पिकाला उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश तसेच कोरडे हवामानाची आवश्यकता असते. मात्र परिसरात झालेल्या परतीच्या पावसामुळे टरबूज पिकावर भूरी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून दरम्यान टरबूज या पिकावर भूरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍याकडून विविध उपाययोजनेसह फवारणी करण्यात येत आहे. परिसरातील शेतकर्‍याकडून सप्टेंबर महिन्यात टरबूज पिकाची लागवड करण्यात आली होती.

टरबूज पिकाला जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर सुद्धा चांगली मागणी असते. व टरबूज काढणीच्या वेळेस चांगला दर मिळतो त्यामुळे येथील शेतकर्यानी टरबूजची लागवड केली होती. मात्र टरबूज पिकाला पोषक वातावरणाची गरज असते. मात्र मध्यंतरीच्या काळात परतीचा पाऊस, वातावरणातील गारठा व ढगाळ हवामानामुळे टरबूज पिकाला काहीसा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

माजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चिनोदासह परिसरात टरबूट पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येत असते. त्यामुळे शेतकर्‍याचे सर्व आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते.

टरबूज या पिकातूनच मोठा आर्थिक फायदा शेतकर्‍याना मिळत असतो. परंतु टरबूज पिकावर भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने लगतच्या टरबूज पिकाला देखील याची लागण होत असल्याने चांगले पिक देखील या रोगापासून प्रभावित होत असल्यामुळे टरबूज उत्पादक शेतकर्याकडून सांगण्यात येत आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून टरबूज लागवड केलेल्या क्षेत्रावर फवारणी करण्यात येत असल्याचे चित्र चिनोदा परिसरात दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या