मुद्रांक शुल्क दरात डिसेंबरपर्यंत सवलत

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाकाळात सर्व स्तरांचा आर्थिक कणा मोडल्याने शासनाचा विविध मार्गानी येणारा महसूल थांबला होता.

या महसूल वाढीसाठी शासनाने विविध उद्योगांना अनुदान व कर्जे देण्याच्या अनेक योजनांसह मालमत्ता खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले आहेत.

डिसेंबर 2020 पर्यंत शहरी क्षेत्रासाठी 3 तर ग्रामीण भागांसाठी 2 % मुद्रांक शुल्क आकारणीची सवलत कायम राहणार आहे.

त्यानंतर जानेवारी 2021 ते मार्च 2021 पर्यंत या सवलतीत अर्धा टक्के वाढ होणार असल्याचे जिल्हा प्रशासन सुत्रांनी सांगीतले.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातून एकूण 6 हजार 947 दस्त नोंदणी झाली.

या नोंदणीतून जिल्हा प्रशासनाला 13कोटी 24 लाख 1हजार 415 रुपये मुद्रांक शुल्क तीस दिवसांत जमा झाला.

गतवर्षी सहा टक्के मुद्रांक शुल्क असताना सप्टेंबर महिन्यात 4792 दस्त नोंदणीतून सुमारे 13कोटी, 78लाख, 58हजार, 28 रूपये उत्पन्न मुद्रांक शुल्काव्दारे विभागास प्राप्त झाले होते. मात्र गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी दस्त नोंदणीत वाढ झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *