गंगापूर धरणातून ५०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरु

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । Nashik

नाशिककरांचे तहान भागविणारे गंगापूर धरण ९४ टक्के भरले असून रविवारी (दि.२३) दुपारी एक वाजता धरणातून ५०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरु झाला. गंगापूर धरणाचा यंदाच्या हंगामातील हा पहिला विसर्ग ठरला आहे.

गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर व अंबोली घाट परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने धरण ९४ टक्के इतके भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग करावा लागेल असे जिल्हाप्रशासनाने एक दिवस अगोदरच जाहीर केले होते.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवून खबरदारी घेण्यात आली. त्यानूसार रविवारी दुपानंतर धरणाचे पाच गेट एक फुटाने वर करुन गोदेत पाणी सोडण्यात आले.

हळूहळू विसर्गाचा वेग वाढवून १५०० क्यूसेस केला जाणार आहे. विसर्गामुळे गोदा दुथडी भरुन वाहत आहे. पाणी पातळी वाढणार असल्याने गोदा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी गाडी फिरवून भोंग्याद्वारे विसर्गाची पूर्व कल्पना देत नागरिक व दुकानदारांना सतर्कतेचा इशारा दिला. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *