Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा होणार अधिक बळकट

…म्हणून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा होणार अधिक बळकट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) पडणाऱ्या पावसाची नोंद (Rainfall record) स्वतः महापालिका (Nashik NMC) आता घेणार आहे. पाऊस मोजमाप करण्याची यंत्रणा मनपाकडे नव्हती…

- Advertisement -

राज्य शासनाच्या (State Government) सिंचन विभागाकडून (Irrigation) ती माहिती महापालिकेला मिळायची, मात्र माहिती नियमित मिळत नसल्यामुळे विविध प्रकारच्या कामांमध्ये अडचणी येतात. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी शहरातील सहाही विभागांमध्ये पर्जन्य मोजमाप यंत्रणा “रेन गेज’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिका हद्दीत पावसाळ्यात समस्या उद्भवल्यास त्यावर प्रतिबंधासाठी महापालिका स्वताची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक भक्कम करणार आहे. त्यासाठी महापालिका शहरातील सहाही विभागातील अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) कार्यालयावर पाऊस मोजण्यासाठी रेन गेज मशीन बसविणार आहे.

महापालिका आयुक्तांनी सोमवारी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली. त्यात आपत्ती व्यवस्थापन विषयक त्रूटी दूर करण्यासाठी शहरातील पावसाचे मोजदाद, विसर्गाची माहिती घेणे यासह जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) संर्पकात राहून आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना बळकट करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जसा पाऊस मोजला जातो. त्याप्रमाणे शहरातील प्रत्येक विभागातील पावसाची माहिती अद्यावत स्वरुपात मिळण्यासाठी स्वयंचलित रेन गेज बसविले जातील. त्यात पाऊस मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची गरज असणार नाही. स्वयंचलित पध्दतीने त्याचे संगणकावर रोजच्या रोज नोंद होईल अशी यंत्र बसविली जाणार आहेत.

त्यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र देउन धरणातून सोडण्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी सोडल्यानंतर शहरात नदी काठी राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतरापासून तर त्यांचे तात्पुरते पुर्नवसन करणे महापालिकेच्या यंत्रणेला शक्य होणार आहे.

सेवकांना मिळणार गणवेश

नैसर्गिक आपत्ती किंवा पूरस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना रस्त्यावर काम करावे लागते. मात्र गर्दीत त्यांना अडचणी येतात. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना स्वताचा गणवेश असल्याने ते त्वरीत लक्षात येतात. पण इतर कर्मचारी लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडथळे येतात. ते टाळण्यासाठी स्वतंत्र ड्रेस कोडअसावा, अशाही सूचना महापालिका आयुक्तांनी मांडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या