Wednesday, April 24, 2024
Homeजळगावदिव्यांग मुला-मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे गरजेचे

दिव्यांग मुला-मुलींना शिक्षण प्रवाहात आणणे गरजेचे

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )
स्व.तुळसाआई बहुउद्देशीय महिला मंडळ विटनेर Tulsai Multipurpose Women’s Circle Whitner (ता.चोपडा) संचलित मुकबधीर विद्यालयात Mukbadhir Vidyalaya दि.३ डिसेंबर २०२१ अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा International Disability Day करण्यात आला.यावेळी तहसीलदार अनिल गावित Tehsildar Anil Gavit यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उदघाटन करण्यात आले. दिव्यांग मुला- मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे नितांत गरजेचे आहे असे आवाहन तहसीलदार अनिल गावित यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.हेलनकेलर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.या प्रसंगी तहसीलदार अनिल गावित यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून संस्थेच्या अध्यक्षा लिलाताई पाकळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थी पालक रावसाहेब हेमंत हरपे, संस्थेच्या संचालिका वैशाली हरपे यांचा सत्कार करण्यात आला.दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून व विविध खेळ खेळले.तहसीलदार अनिल गावित यांच्या हस्ते मुक बधीर विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे कीट देण्यात आले.दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची नितांत गरज असून, बाह्य जगाचा अनुभव शिक्षणा शिवाय नाही.असे सांगून तहसीलदार गावित यांनी संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून संस्थाध्यक्ष लिलाताई पाकळे,बी. डी.पाकळे सर यांना शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन पाकळे यांनी केले तर मुख्याध्यापक रवींद्र भवराळे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.वैशाली मॅडम,देविदास धनगर, संतोष धनगर,उमेश धनगर यांनी परिश्रम घेतलेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या