Saturday, May 11, 2024
Homeनाशिकदिव्यांग निधी गैरप्रकाराची चौकशी करणार - भुसे

दिव्यांग निधी गैरप्रकाराची चौकशी करणार – भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे, असा कायदा असल्याने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मात्र मनपात निधीचे वाटपात गैरप्रकार होत असल्याची दिव्यांगांतर्फे करण्यात आलेली तक्रार लज्जास्पद आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे निर्देश दिले जाईल. ज्यांनी गैरप्रकार केला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse)यांनी शहरच नव्हे तर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन येथे बोलतांना दिले.

- Advertisement -

येथील मनपा शाळा क्र. 1 च्या प्रांगणात दिव्यांग एज्युकेशन व वेल्फेअर सोसायटीच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिव्यांगांना बैसाखी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भुसे बोलत होते. अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंग संधू, रविष मारू, अ‍ॅड. मुजीब मोमीन, जमील क्रांती, मोहंमद मुस्तफा, अनीस सरताज, इजाज शाहीन, मोमीन मुसद्दीक, मुस्तफा जिया आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मुदस्सीर रजा यांनी प्रास्ताविक करत मनपातर्फे पाच टक्के निधीतून मिळत नसलेल्या सुविधा तसेच निधीचा होत असलेला गैरप्रकार व शहरातील दिव्यागांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

दिव्यांगांची सेवा करणे सर्वोच्च धर्म आहे. शहरातील दिव्यागांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या रोजगारासाठी दिव्यांग सोसायटीतर्फे होत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, आ. बच्चू कडू सातत्याने दिव्यागांचे प्रश्न मांडत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी या समस्यांकडे लक्ष वेधल्याने मुख्यमंत्र्यांनी कॅबीनेट बैठकीत दिव्यागांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेत घोषणा केली आहे. देशात एकमेव महाराष्ट्र राज्य आहे जेथे दिव्यांगांसाठी मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यागांच्या समस्या निश्चित दूर होतील. दिव्यांगांना सवलत दिली जाते की नाही हे पाहण्याचे काम देखील हे मंत्रालय करेल, अशी ग्वाही दिली.

दिव्यांग सोसायटीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याने एक लाखाचा निधी आपण स्वत: देत असल्याची घोषणा करत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, दिव्यांग सोसायटीला मोकळे भुखंड देण्यासाठी मनपा आयुक्तांना निर्देश दिले जाईल. तसेच या भुखंडावर कंपाऊड व कार्यालयासाठी आपल्या आमदार निधीतून दहा लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी मार्गदर्शन करतांना अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांनी दिव्यांग सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक केले. दिव्यांगांच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. कुणास त्रास होत असल्यास त्यांनी त्वरीत तक्रार करण्याचे आवाहन भारती यांनी केले. यावेळी जमील क्रांती, रविष मारू, उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. मुजीब मोमीन आदींची भाषणे झालीत. यावेळी 20 दिव्यांगांना बैसाखीचे तर उदरनिर्वाहसाठी पाच दिव्यांगांना शिलाई मशीनचे वाटप केले गेले. मोठ्या संख्येने दिव्यांग व नागरीक कार्यक्रमास उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या