राज्यभरातील कृषिपंपांना डिसेंबर अखेरपर्यंत वीजजोडणी-महावितरणचे निर्देश

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

पैसे भरून प्रलंबित असलेल्या राज्यातील एक लाख कृषिपंपांना (agricultural pump) डिसेंबर २०२२ पर्यंत वीजजोडणी (Power connection) देण्याचा महावितरणचा निर्धार असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.

प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार…

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद परिमंडल व नगर मंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे (औरंगाबाद शहर), प्रवीण दरोली (औरंगाबाद ग्रामीण), अर्शद खान पठाण (जालना), सुनील काकडे (नगर), मोहन काळोगे (स्थापत्य) यांची प्रमुख उपस्थिती होती. एक लाख कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या उद्दिष्टानुसार महावितरणकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३० मीटर अंतरापर्यंतच्या प्रलंबित वीजजोडण्या येत्या २४ तासात देण्यात याव्यात. तसेच ३१ ते २०० मीटर अंतर असलेल्या प्रलंबित कृषिपंप वीजजोडणीसाठी उपलब्ध असलेल्या आकस्मिक निधीच्या कामाचे शंभर टक्के आदेश काढण्यात यावेत. कृषी आकस्मिक निधी कसा वाढविता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. तसेच २०१ मीटर ते ६०० मीटर अंतरातील प्रलंबित वीजजोडणीसाठी जिल्ह्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वीजजोडणीच्या कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचक इशारा ताकसांडे यांनी दिला. 

सद्यस्थितीत वीज मीटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलावेत आणि अचूक बिलिंग करावे, असे स्पष्ट निर्देश यावेळी त्यांनी दिले. बैठकीला परिमंडल कार्यालयातील सर्व विभाग प्रमुखांसह औरंगाबाद, जालना तसेच नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

विद्युत यंत्रणेची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे, रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी करणे, जास्त वीज हानी असलेल्या वाहिन्यांवरील वितरण हानी दिलेल्या उद्दिष्टानुसार कमी करणे, मागणीनुसार वीजपुरवठा करणे ही महावितरणची जबाबदारी आहे आणि त्यानुसार काम करण्याचे निर्देश देताना कामात निष्काळजीपणा आढळल्याने पाच उपकार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.

महावितरणचे काम करणारे कंत्राटदार महावितरणच्या व्यवस्थेचा भाग आहेत. शिवाय त्यांचा कॉस्ट डाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारांनीही महावितरणच्या एक लाख कृषिपंप वीजजोडणीच्या निर्धारात सामील होऊन वीजजोडणी लक्ष्य पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी कंत्राटदारासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी केले.

प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *