Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक तयार करणार- खा.डॉ.हिना गावित

अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक तयार करणार- खा.डॉ.हिना गावित

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार येथे डायरेक्ट व्हॉलीबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबर महिन्यानंतर घेण्यात येणार आहेत.

- Advertisement -

त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये डायरेक्ट व्हॉलीबॉलचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

तसेच जिल्ह्यातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक हे केंद्र शासनाच्या निधीतून तयार करण्यात येणार असल्याचे नंदुरबार डिस्ट्रिक्ट डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा तथा खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

नंदुरबार येथे डिस्ट्रिक्ट डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनची बैठक काल दि.3 रोजी असोसिएशनच्या अध्यक्षा खा.डॉ.हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

याप्रसंगी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष श्याम मराठे, सचिव प्रा.ईश्वर धामणे, खजिनदार बळवंत निकुंभ, सचिव प्रा.तारक दास, दीपेश धामणे, सदस्य पवन नाईक, राहुल ठाकूर, संग्रामसिंग राजपूत उपस्थित होते.

या बैठकीत डायरेक्ट व्हॉलीबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबर महिन्यानंतर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी नोव्हेंबर महिन्यात खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचा नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये प्रसार व प्रचार करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी खा. डॉ. हिना गावित म्हणाल्या की, नंदुरबार डिस्ट्रिक्ट डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्यावतीने राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा डिसेंबर महिन्यानंतर होतील.

जिल्ह्यातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रेक केंद्र शासनाच्या निधीतून तयार करण्यात येईल.

त्याचबरोबर जिल्ह्याभरात राष्ट्रीय स्पर्धेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या