Wednesday, April 24, 2024
Homeजळगावदीपोत्सवाने बाजारात चैतन्य

दीपोत्सवाने बाजारात चैतन्य

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दीपोत्सवाला (Deepotsava) शुक्रवारी मोठ्या उत्साहात (excitement) आणि मंगलमय वातावरणात (pleasant environment) प्रारंभ झाला असून खरेदीसाठी (shopping) नागरिकांची (citizens) गर्दी (crowd) होत असल्याने शहरातील बाजारपेठां (markets) मध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले.

- Advertisement -

वसुबारसला शुक्रवारी सकाळी पांझरपोळा येथे गो-मातेचे पूजन करण्यात आले. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून गाय, वासरु यांची पूजा यावेळी करण्यात आली. श्रीराम रांगोळी गृपतर्फे गो- वत्स धन पुजनाचा कार्यक्रम दुपारी चार वाजता घेण्यात आला. यावेळी पांझर पोळा येथे महारांगोळी रेखाटली होती. आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते गाय वासराची पुजा करण्यात आली.

आज धऩत्रयोदशी

धनयत्रयोदशीला घरोघरी सायंकाळी धनलक्ष्मी, कुबेर, दागिने, धनाची पुजा करून नैवद्य दाखविण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी अनेक जण सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधतात. त्यामुळे सुवर्ण बाजारात तसेच अन्य बाजारपेठेत मोठी गर्दी शनिवारी पाहण्यास मिळणार आहे.

नोकरदारांचे पगार अन् खरेदीला गर्दी

अनेक नोकरदार वर्गाचे आज पगार झाल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झालेली होती. फुले मार्केट परिसरात अन्य मार्केटमध्ये दिवसभर प्रचंड गर्दी झालेली होती.

गांधी मार्केट ते सुभाष चौक रस्ता बहरला

दीपोत्सवनिमित्त कपडे खरेदीसह विविध फराळाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झालेली होती. त्यात गांधी मार्केट ते सुभाष चौक दरम्यान थाटलेल्या लहान व्यवसायिकांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी होती. लक्ष्मीपुजनासाठी लागणारे केरसुनीपासून तर रांगोळी आदी वस्तू खरेदीसाठी लगबग सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या