Saturday, April 27, 2024
Homeनगरनगरची पूर्वजा राज्यात नंबर वन

नगरची पूर्वजा राज्यात नंबर वन

अहमदनगर (प्रतिनिधी) –

कथ्थक नृत्य स्पर्धेतही नगरचे नाव राज्याच्या पटलावर झळकले आहे. नगरमधील पूर्वजा श्रीनिवास बोज्जा हिने विशेष गुणवत्तेसह

- Advertisement -

राज्यात पहिला नंबर मिळाल्याची माहिती कल्याणी कामतकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात आलेल्या कथक पदविका परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहतेत. त्यात अहमदनगरची पूर्वजा बोज्जा विशेष गुणवत्तेसह पहिली आल्याचे कथक नृत्यलयाच्या संचालिका कल्याणी कामतकर यांनी सांगितले. त्यांच्या विद्यालयाच्यावतीने प्रारंभीक ते पदविका या परीक्षेमध्ये सर्वच विद्यार्थिनींनी प्रथम वर्ग मिळवून उत्तीर्ण झाले असून कथक नृत्यालयचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

कथ्थक परिक्षेसाठी राज्यातून 185 विद्यार्थी बसले होते. त्यात पूर्वजा नंबर वन आली. तिचे हे यश नगरकरांसाठी अभिमानास्पद व सांस्कृतिक क्षेत्रात भर घालणारे आहे. पूर्वजाचे प्राथमिक शिक्षण ओक्झ्लिीयम कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले असून सध्या ती न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये बायोटेकचे प्रशिक्षण घेत आहे. ती माजी नगरसेविका वीणाताई बोज्जा व फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांची कन्या आहे. कु.पूर्वजा हिने नगर शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याने मने जिंकली आहेत.

शास्त्रीय संगीताचे धडे तिने कल्याणी कामतकर यांच्याकडून घेतले आहेत. कल्याणी कामतकर या प्रसिद्ध नृत्यांगना मनीषाताई सादये यांच्या शिष्या असून त्या सावेडी व नगर येथे गेल्या दहा वर्षापासून कथक नृत्यालयाचे वर्ग चालवितात. कथक नृत्य वरील प्रेम व अविरत मेहनत यामुळेच पूर्वजाला हे यश मिळाले असल्याचे कामतकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या