Wednesday, April 24, 2024
Homeनगरदिवाळीत वीज कर्मचारी जाणार संपावर

दिवाळीत वीज कर्मचारी जाणार संपावर

अकोले |प्रतिनिधी|Akole

सानुग्रह अनुदान, बोनस,व पगारवाढीचा दुसरा हप्ता दिवाळी पूर्वी देण्यात यावा या मागणी साठी वीज कंपनीतील वीज कामगार

- Advertisement -

महासंघ सह इतर प्रमुख संघटनाबरोबर बावीस संघटनानी एकत्र येऊन शनिवार दि. 14 रोजी संपाचा इशारा दिला आहे. अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली. वीज मंडळातील कामगार, अभियंते, अधिकारी यांच्या कार्यरत असणार्‍या सर्व संघटनांनी सर्व कर्मचार्‍यांना नेहमीच्या परंपरेनुसार दिवाळी पूर्वी सानुग्रह अनुदान, बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता याचे वेतन अदा करण्याची मागणी एका पत्रा नुसार 5 नोव्हेंबर रोजी केली होती.

मात्र वीज मंडळ प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.त्यामुळे सर्व संघटना नाराज होऊन दिवाळी पूर्वी रक्कम अदा न केल्यास गुरुवार दि. 12 रोजी राज्यव्यापी निदर्शने व निषेध सभा आंदोलन करतील, त्यानंतर हि काही निर्णय न झाल्यास शनिवार दि. 14 रोजी सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी व सर्व संघटनांचे सभासद संप करतील असा इशारा वीज प्रशासनाला दिला आहे.

ऐन दिवाळीत वीज मंडळातील सर्व संघटना एकत्र येऊन संपाचा इशारा दिल्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महराष्ट्रात अंधार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज मंडळ प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्व वीज कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या