Thursday, April 25, 2024
Homeनगरभाजपकडून यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही - दीपक केसरकर

भाजपकडून यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही – दीपक केसरकर

शिर्डी (शहर प्रतिनिधी)

भाजपचे किरीट सोमय्या यांनी आज ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव केला, या टिपण्णीवर तीव्र आक्षेप घेत किरीट सोमय्या उद्धव ठाकरेंंबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आमचे नेते आहे. आम्ही ताबडतोब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबद्दल कळविले असून ते निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आ.दिपक केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

- Advertisement -

दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते आ.दिपक केसरकर यांनी गुरुवार दि.८ जुलै रात्री साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले.दर्शनानंतर आ.केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आ.दिपक केसरकर हे साईबाबांचे निस्सिम भक्त आहे. गुवाहाटीला असतांंना देखील त्यांनी तेथील साईमंदिरात जावून साईबाबांचे दर्शन घेतले होते. शिंदे गट आणि भाजपच्या वतीने साईचरणी लीन झाल्याचे सांगत उठावाला चांगले यश आल्याने श्री साईबाबांचे आभार मानण्यासाठी शिर्डीत आल्याचे त्यांनी म्हटले.

बाबांचा श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र आमच्या सोबत होता त्यामुळे उठावाच्यावेळी आमच्या एका ही आमदाराने तोल ढळू दिला नाही. गैरसमज निर्माण केला जात होता मात्र त्याला समर्पक उत्तर देण्याची बुद्धी साईबाबांनी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केल्याने आ.दिपक केसरकर संतप्त झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

यावेळी गद्दार हे गद्दारच असतात मात्र ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे या आदित्य ठाकरेंंच्या वक्तव्यावर आ.केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले असून आदित्य ठाकरे खूप लहान आहे, तुम्ही गद्दार कोणाला म्हणता ? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा.

आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही.मी आदित्य ठाकरेपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे. जेव्हा आदित्य ठाकरे येतात, तेव्हा मी उठून उभा राहातो. कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव‌ ठाकरेंचा आहे.तुमच्याकडे तो वारसा आल्यामुळे तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे.आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव साहेबांकडून शिकावे.त्यांनी ते संजय राऊतांकडून शिकू नये असा खोचक सल्ला त्यांनी आदित्यला दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या