Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिलीप प्रभावळकर यांना अ. भा.नाट्य परिषदेकडून स्व. प्रा.वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार

दिलीप प्रभावळकर यांना अ. भा.नाट्य परिषदेकडून स्व. प्रा.वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अभिनय (acting) अनेक छंदांपैकी एक आहे. अनेक लोकांच्या प्रोत्साहानाने या प्रवाहात आणले. त्यातूनच या छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले. यावेळी समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नाटकात दिसते. कुसुमाग्रजांचा (kusumagraj) सहवास लाभला नाहीपण कानेटकरांचा लाभला. आज साहित्यिक आणि सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या याच नाशिक (nashik) शहरात कानेटकरांच्या (Kanetkar) नावाने पुरस्कार मिळाला हे अत्यंत भाग्यच वाटतं असे प्रतिपादन दिलीप प्रभावळकर यांनी केले.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद (Akhil Bharatiya Marathi Natay Parishad), नाशिक शाखेच्या वतीने वि. वा. शिरवाडकर (V. Va. Shirwadkar) लेखन पुरस्कार (writing award) शफाहत खान, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार (Vasant Kanetkar Rangkarmi Award) दिलीप प्रभावळकर व बाबुराव सावंत नाटयकर्मी पुरस्कार (Baburao Sawant Natyakarmi Award) रवींद्र ढवळे यांना कालिदास कलामंदिर (Kalidas Kalamandir) येथे मराठी रंगभूमी दिनाचे (Marathi Theater Day) औचीत्यावर सोमवार दि २५ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी त्या कार्यक्रमांत शिबानी जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यांचं कार्यक्रमात राजकारण्याच्या सभा, आंदोलन सगळे कार्यक्रम सरार्स होतात पण नाटकवाल्यामुळेच संसर्ग पसरतो असा समज करून नाटक बऱ्याच काळ बंद ठेवले होते. कारण व्यवस्था नाटकाला घाबरते. पण नाटकावर कितीही संकट आले तरी नाटक कधी मेल नाही. तसेच आताही सगळ्या बदलाला पचवून नाटक आजही जिवंत आहे.

या काळातून उभारी घेतं नाटक नव्याने उभे राहील असे मनोगत नाटयलेखन पुरस्काराने सन्मानित शफाहत खान यांनी व्यक्त केले. प्रमुखं पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी आम्ही राजकारणी सुद्धा नाटकांवर प्रेम करणारी माणसं आहोत. आपले मुख्यमंत्री सुद्धा एक कलाकर आहेत. त्यामुळे नाटकासारख्या सांस्कृतिक कार्यक्रम (cultural events) होत राहने यासाठी आमचा कायम प्रयत्न असतो.

त्यामुळे नाटक सुरू करण्याचा निर्णय घ्यायला मुद्दाम उशिरा केला हे म्हणन चुकीच आहे. नाटकामुळे लोकं दोन तीन तास एकत्र असतात येतात तेव्हा संसर्गाची शक्यता अधिक होती म्हणून काळजी पोटी अशी भूमिका घेतली होती. पण कलाकारांना अनेक संकटातून जाव लागल याची कल्पना आहे. पण जसे टी. व्ही. मिडिया आली म्हणून वर्तमान पत्र संपले नाही तसे बंद मुळे जरी ओ.टी.टी. ला लोकं जोडले असले तरी सुद्धा तुम्हीं तयारीला लागा नाटक सुरू झालं म्हणजे लोकं प्रतिसाद नक्की देतील असे प्रतिपादन केले.

त्यावेळी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मीचा सन्मान, विशेष योगदान पुरस्कार व दिवंगत रंगकर्मीच्या कुटुंबियांचा सन्मान पुरस्कारांचही वितरण करण्यात आले. यावेळी रवींद्र कदम, शाहू खैरे, सुनील ढगे, डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी सह सर्व सभासद, रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित होते.

मराठी रंगभूमी विशेष पुरस्कार

  • स्वर्गीय दत्ता भट पुरस्कार अभिनय पुरुष : राजेंद्र चव्हाण

  • स्वर्गीय शांता जोग स्मृती पुरस्कार,अभिनय स्त्री : रोहिणी ढवळे

  • स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार,दिग्दर्शन : रवींद्र कदम

  • स्वर्गीय नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार लेखन : विवेक गरुड

  • स्वर्गीय वा श्री पुरोहित स्मृती पुरस्कार : धनंजय वाबळे

  • बालरंगभूमी स्वर्गीय जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार, सांस्कृतिक पत्रकारिता : फणींद्र मंडलिक

  • स्वर्गीय रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार नेपथ्य : चंद्रकांत जाडकर

  • स्वर्गीय गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार,प्रकाशयोजना : विजय रावळ

  • स्वर्गीय रामदास बरकले स्मृती पुरस्कार,लोक कलावंत : रमाकांत वाघमारे

  • स्वर्गीय शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती : राजन अग्रवाल

विशेष योगदान पुरस्कार सन २०२०-२१ चे मानकरी

  • अविराज तायडे

  • सुभाष दसककर

  • नितीन वारे

  • नवीन तांबट

विशेष पुरस्कार कोविड योद्धा

  • डॉ. संजय धुर्जड

  • डॉ. मिलिंद पवार

विशेष सन्मान

  • साहित्य अकादमी पुरस्कार विजेता प्राजक्त देशमुख

  • झी लावण्यवती क्षमा देशपांडे

  • झी लावण्यवती नृत्यांगना शिरीन पाटिल.

- Advertisment -

ताज्या बातम्या