Dilip Kumar : दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ का म्हणतात?

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजिडी किंग (Tragedy King) दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. मागील महिन्यात ३० जूनला हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांचा कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका केल्या. यानंतर ते ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक गंभीर पात्रं साकारली आणि यामुळेच त्यांना हे नाव मिळालं, पण असं म्हणतात की या गंभीर भूमिकांमुळे त्यांनाही नैराश्याने ग्रासले आणि त्यासाठी त्यांनी उपचार देखील घेतले.

दिलीप कुमार यांचा जन्म १ डिसेंबर १९२२ मध्ये ब्रिटीशकालीन भारतात आणि आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. दिलीप कुमार यांचे खरे नाव युसुफ खान (Mohammad Yusuf Khan) होते. त्यांनी आपले शिक्षण नाशिक येथील देवळाली (Deolali Nashik) येथे केले. राज कपुर (Raj Kapoor) हे त्यांचे बालपणीचे मित्र होते. तेव्हापासूनच दिलीपकुमार यांची बॉलिवूडची (Bolywood) सफर सुरु झाली होती.

सुमारे २२ वर्षांचे असतानाच दिलीप कुमार यांना पहिला चित्रपट मिळाला. १९४४ मध्ये त्यांनी ‘ज्वार भाटा’ (jwara bhata) चित्रपटात काम केले. परंतू त्या वेळी त्यांच्या चित्रपटाची विशेष चर्चा झाली नाही.

दिलीप कुमार यांना फिल्मफेअर (filmfare awards) चे सर्वात अधिक पुरस्कार तर मिळवले आहेतच, सोबतच आणि गिनीज बुकमध्ये (Guinness Book of World Record) नाव देखील नोंदविले आहे. भारत सरकार ने १९९१ मध्ये पदम भूषण देऊन त्यांचा सन्मान केला. १९९४ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार ही मिळवले त्यानंतर अनेक पुरस्कार सन्मानित झाले.

दिलीप कुमार यांनी जुवळपास पाच दशके केलेल्या करीअरमध्ये ६० पेक्षाही अधिक चित्रपट केले. त्यांनी आपल्या चित्रपट करीअरमध्ये अनेक चित्रपट नाकारले. कारण त्यांचे असे म्हणने होते की चित्रपट कमी असतील तरी चालतील पण ते चांगले असायला हवेत. प्यासा, दीवार यांसारख्या चित्रपटात काम करु शकले नाहीत याबाबत त्यांना कायम खंत होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *